तीन महिन्यांपूर्वी आम्ही जो कार्यक्रम (बंड) केला तो जनतेच्या हितासाठी केला आहे. चांगले वाईट विचारांचे लोक असतात पण आपण त्याची परवा करायची नसते चांगला काम करत राहायचं अस म्हणत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोला लगावला आहे. ते आळंदीत मृदंगज्ञान या संस्थेच्या कार्यक्रमात बोलत होते. वारकरी हे महाराष्ट्रच वैभव आहे. वारकरी संप्रदाय एक मोठी शक्ती, ताकद आहे असं देखील त्यांनी नमूद केलं. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले ” महाराष्ट्राला अलौकिक अशी संत परंपरा लाभलेली आहे. कुठल्या क्षेत्राला, प्रांताला असं भाग्य लाभलेलं नाही. यामुळे देशात महाराष्ट्राला वेगळं स्थान आहे. तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत. वारकरी संप्रदायात एक मोठी शक्ती आहे, ताकद आहे. वारकरी संप्रदायात भजन, कीर्तन याला मोठं स्थान आहे. धावपळीच्या जीवनात थोडावेळ का होईना पांडुरंगाचं नामस्मरण करतो. त्यामुळं आपल्याला मानसिक समाधान मिळतं. ऊर्जा मिळते डोक्यात सकारात्मक विचार येतात. माणूस म्हटलं की राग, मत्सर, लोभ येतो. त्यामुळं स्पर्धा निर्माण होते. स्पर्धा असावी परंतु लोकांच्या हिताला प्राधान्य देणारी असावी. मला काहीतरी मिळवायचं आहे म्हणून स्पर्धा नको. आम्ही जो तीन महिन्यांपूर्वी कार्यक्रम (बंड) केला तो जनतेच्या हितासाठी केलेला आहे. चांगलं काम करत राहायचं”. शिंदेंच्या भाषणादरम्यान इंद्रायणी स्वच्छ करण्याची मागणी एका वारकाऱ्याने केली असता इंद्रायणी स्वच्छ करण्याबाबत संबंधित प्रशासनाला सूचना देण्यात येतील असे ते म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The rebellion that took place three months ago was for the benefit of the people chief minister eknath shinde kjp
Show comments