पुणे : रॅप साँग चित्रीकरण प्रकरणी संबंधित तरुणाविरोधात पोलिसांमार्फत चौकशी सुरू आहे. या प्रकरणी एक चौकशी समिती नेमण्यात आली असून तिची आज बैठक होणार आहे. त्या बैठकीचा प्राथमिक अहवाल उद्या संध्याकाळपर्यंत मिळणार आहे. संबंधित व्यक्तीवर कारवाई होणार, असे पुणे विद्यापीठातर्फे सांगण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सावित्रीबाई फुले विद्यापीठात रॅप साँग चित्रीकरण प्रकरणी वाद सुरू असून, चित्रीकरणास दिलेल्या परवानगीच्या निषेधार्थ आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठात जोरदार आंदोलन केले. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घुसून घोषणाबाजी केली. तसेच आंदोलकांनी कागदपत्रे फाडून ती उधळली आणि दरवाजे आणि खिडक्यांच्या काचादेखील फोडल्या. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी ठिय्या मांडत जोवर मागण्या मान्य होत नाही. तोवर ठिय्या मांडून निषेध नोंदविला. दरम्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, व्यवस्थापन परिषद सदस्य रवींद्र शिंगनापूरकर आणि अन्य सदस्यांची बैठक तब्बल एक तास चालली. त्या बैठकीनंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. काळे आणि व्यवस्थापन परिषद सदस्य रवींद्र शिंगनापूरकर यांनी सयुक्त पत्रकार परिषदेतून सदर माहिती दिली.

हेही वाचा – “तीन अपत्य असलेल्या आमदार आणि खासदारांना अपात्र ठरवावं”, अजित पवारांचं बारामतीत विधान

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातील क्रिडा संकुल विद्यार्थी वर्गाला उपलब्ध होत नाही. त्याबाबत तक्रार होती. त्यावर आजच्या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाली. त्यानुसार १ मे महाराष्ट्रदिनी काही अटी आणि शर्तीनुसार विद्यार्थ्यांना क्रिडा संकुल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. काही विद्यार्थ्यांना शून्य मार्क मिळाल्याचे समोर आले आहे. त्या विद्यार्थ्यांची यादी प्राप्त होताच पुढील २४ तासांत त्यावर कार्यवाही केली जाणार आहे. पदवी प्रदान सोहळा केव्हा होणार अशी मागणी करण्यात आली होती. १५ ते २० मे दरम्यान पदवी प्रदान सोहळा आयोजित केला जाईल. तसेच मागील काही दिवसांपासून विद्यापीठ परिसरात रॅप साँग चित्रीकरण प्रकरणाची चर्चा सुरू असून संबंधित तरुणाविरोधात पोलिसांमार्फत चौकशी सुरू आहे. तसेच या प्रकरणी एक चौकशी समिती नेमण्यात आली असून तिची आज बैठक होणार आहे. त्या बैठकीचा प्राथमिक अहवाल उद्या संध्याकाळपर्यंत मिळणार आहे. या समितीचे काम अनेक काळ चालू राहील आणि संबधितावर कारवाई होणार, अशी माहिती कुलगुरू काळे आणि व्यवस्थापन परिषद सदस्य रवींद्र शिंगनापूरकर यांनी सयुक्त पत्रकार परिषदेतून दिली. तसेच आज ऑफिसमध्ये येऊन आंदोलन करणार्‍यांविरोधात विद्यापीठ प्रशासनामार्फत पोलिसांकडे तक्रार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The report of the rap song filming case will be received tomorrow action will be taken says pune university vice chancellor svk 88 ssb
Show comments