लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी: महापालिकेच्या विविध विभागांतील ‘ब’ आणि ‘क’ गटातील १५ पदांच्या ३८८ जागांसाठी मे महिन्यात झालेल्या ऑनलाइन परीक्षेच्या ११ पदांच्या ३५ जागांचा निकाल पालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. आरक्षणानुसार उमेदवारांची यादी तयार करण्यात येणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी सांगितले.

fake graduation certificate pune municipal corporation
पुणे महापालिकेच्या उपायुक्तासह शिक्षणाधिकारी, लिपिकाविरुद्ध गुन्हा दाखल; बनावट पदवी सेवा पुस्तिकेत जोडून महापालिकेची फसवणूक
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
job opportunities direct recruitment in directorate of medical education
नोकरीची संधी : वैद्याकीय शिक्षण संचालनालयात सरळसेवेने भरती
investors of DSK, Maval-Mulshi sub-divisional magistrate, Court, DSK,
‘डीएसके’ यांच्या गुंतवणूकदारांची यादी सादर करण्याचे मावळ-मुळशी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना न्यायालयाचे आदेश
ajit pawar
पिंपरी: अजित पवारांच्या पक्षाच्या देहू शहराध्यक्षाच्या मोटारीतून रोकड जप्त
Recruitment in town planning department
नोकरीची संधी : नगररचना विभागात भरती
Loksatta explained What is the reason for the dissatisfaction of gig workers
‘गिग’ कामगारांनी साजरी केली ‘काळी दिवाळी’! त्यांच्या असंतोषाचे कारण काय? सामाजिक सुरक्षेचा लाभ किती?
Pimpri, Female computer operator bribe, computer operator bribe Female, bribe,
पिंपरी : सहाशे रुपयांची लाच घेताना संगणक चालक महिला अटकेत

महापालिकेच्या विविध विभागांतील ३८८ जागांसाठी मे महिन्यामध्ये तीन दिवस ऑनलाइन पद्धतीने राज्यातील विविध केंद्रांवर ५५ हजार ८२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. अतिरिक्त कायदा सल्लागार, विधी अधिकारी, उप मुख्य अग्निशामक अधिकारी, विभागीय अग्निशामक अधिकारी, उद्यान अधीक्षक (वृक्ष), उद्यान निरीक्षक, पर्यवक्षेक, न्यायालयीन लिपिक, समाजसेवक, आरोग्य निरीक्षक, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, कनिष्ठ अभियंता लिपिक या पदांसाठीची परीक्षा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) माध्यमातून घेण्यात आली.

हेही वाचा… पुणे: पिस्तुलाच्या धाकाने संगणक अभियंता तरुणीवर बलात्कार

परीक्षेनंतर उमेदवारांच्या हरकती मागविण्यात आल्या होत्या. यामधील ११ पदांच्या ३५ जागांबाबत आलेल्या हरकतींचा निपटारा झाला आहे. ३५ जागांसाठी दोन हजार ६७९ जणांनी परीक्षा दिली असून, या जागांचा निकाल महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), लिपिक या चार पदांचा निकाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच या जागांचाही निकाल जाहीर केला जाणार असल्याचे उपायुक्त जोशी यांनी सांगितले.