सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभेच्या प्राचार्य गटातील खुल्या प्रवर्गातील पाच जागांसाठी रविवारी झालेल्या मतदानाची मतमोजणी मंगळवारी करण्यात आली. त्यात प्राचार्य फोरमचे डॉ. नितीन घोरपडे, डॉ. राजेंद्र झुंजारराव, डॉ. राजेंद्र भांबर, डॉ. प्रदीप दिघे, डॉ. संपत काळे विजयी झाले.विद्यापीठाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. विद्यापीठाच्या अधिसभेत प्राचार्य गटाच्या एकूण दहा जागा आहेत. त्यातील खुला प्रवर्ग वगळता आरक्षित प्रवर्गातील पाच जागांपैकी चार जागा बिनविरोध झाल्या. तर एस.टी प्रवर्गाची जागा रिक्त राहिली आहे. एससी प्रवर्गातून डॉ. देविदास वायदंडे, ओबीसी प्रवर्गातून डॉ. वैभव दीक्षित, एनटी प्रवर्गातून डॉ. गजानन खराटे, तर महिला प्रवर्गातून डॉ. क्रांती देशमुख यांची बिनविरोध निवड झाली. तर खुल्या प्रवर्गातील उर्वरित पाच जागांसाठी रविवारी मतदान झाले. या निवडणुकीतील पाच जागांसाठी नऊ उमेदवार रिंगणात होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा