पुणे : शहरात झिकाचा धोका वाढला असून, आणखी दोन गर्भवतींना संसर्ग झाल्याचे गुरुवारी समोर आले. यामुळे शहरातील झिकाची एकूण रुग्णसंख्या १८ वर पोहोचली असून, त्यातील १० गर्भवती आहेत. झिकाचा धोका गर्भवतींना अधिक असल्याने रुग्ण आढळून आलेल्या परिसरातील गर्भवतींच्या तपासणीवर आरोग्य विभागाने भर दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खराडी परिसरातील ३२ व २५ वर्षे वयाच्या दोन गर्भवतींना झिकाचा संसर्ग झाला आहे. त्यातील एक २२ आठवडे आणि दुसरी १८ आठवड्यांची गर्भवती आहे. या दोघींच्याही ॲनोमली स्कॅन अहवाल चांगले आलेले आहेत. या दोघींना कोणतीही लक्षणे दिसून आली नाहीत. खराडी परिसरात आधी एक झिकाचा रुग्ण आढळून आला होता. त्यामुळे परिसरातील आठ गर्भवतींचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेत पाठविण्यात आले होते. त्यातील दोघींना झिकाचे संसर्ग झाल्याचे अहवाल महापालिकेच्या आरोग्य विभागाला गुरुवारी मिळाले.

हेही वाचा – पुणे : शहरात महायुतीमध्ये तिढा, शिवसेनेकडून तीन विधानसभा मतदारसंघांवर दावा

शहरात आतापर्यंत झिकाचे एकूण १८ रुग्ण आढळले असून, सर्वाधिक ६ रुग्ण एरंडवणे परिसरात सापडले. त्याखालोखाल पाषाण आणि खराडी परिसरात प्रत्येकी ३ रुग्ण आढळले आहेत. मुंढव्यात २ तर डहाणूकर कॉलनी, उजवी भुसारी कॉलनी, आंबेगाव बुद्रुक आणि कळस परिसरात प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. रुग्ण आढळून आलेल्या परिसरात आरोग्य विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत. याचबरोबर डासोत्पती स्थाने शोधून नष्ट केली जात आहेत. डासोत्पत्ती स्थाने आढळल्याप्रकरणी ३३३ घरमालकांना नोटीस बजाविण्यात आली असून, त्यांच्याकडून १ लाख ८८ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

हेही वाचा – भारतात ‘हम दो हमारे एक’ कायदा हवा

ग्रामीण भागातही शिरकाव

शहरात वेगवेगळ्या भागांत झिकाचे रुग्ण आढळून येत असताना आता ग्रामीण भागात झिकाचा शिरकाव झाला आहे. सासवडमध्ये एका ६५ वर्षीय पुरुषाला झिकाचा संसर्ग झाला आहे. त्याला २४ जूनपासून त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याला सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात आणि नंतर पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या रुग्णाचा रक्तनमुना तपासणीसाठी २ जुलैला एनआयव्हीला पाठविण्यात आला. त्याचा तपासणी अहवाल ३ जुलैला मिळाला. या रुग्णाने गेल्या महिन्यातच मिरजला प्रवास केला होता. त्याच्या कुटुंबातील कोणामध्येही अद्याप झिकाची लक्षणे दिसून आलेली नाहीत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The risk of zika increased in pune penetration into rural areas as well know where patients are growing pune print news stj 05 ssb