पुणे: मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. मराठा आरक्षण हा विषय सोपा नाही. समाजाला आरक्षण मिळण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करावा लागेल, अशा शब्दांत स्वराज पक्षाचे प्रमुख माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शनिवारी पुण्यात केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्य मागासवर्ग आयोगाची शनिवारी शासकीय विश्रामगृहात बैठक बोलावली आहे. या बैठकीआधी संभाजीराजे यांनी आयोगाची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. संभाजीराजे म्हणाले, की १५ दिवसांपूर्वी आयोगाला पत्र पाठवले होते. त्यानुसार शनिवारी पुण्यात बैठकीआधी आयोगाने वेळ दिली. आयोगासमोर मराठा समाजाचे काही प्रश्न मांडले.

हेही वाचा… पुणे: शेजाऱ्यांशी झालेल्या वादातून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

गरीब मराठा समाजावर अन्याय होत आहे. रोहिणी आयोगाची शिफारस, क्युरेटिव्ह याचिका कुणबी-मराठा, मराठा-कुणबी समाजाला सरसकट आरक्षण देता येते किंवा कसे? पोटजात मराठा यान अडेऊ शकता का? गायकवाड आयोगाने दिलेले पुरावे तपासले किंवा कसे? आदी मुद्द्यांवर चर्चा केली. आयोग स्वायत्त आहे, त्यावर कोणाचे बंधन नाही. मी समाजाच्या वतीने मांडलेल्या प्रश्नांची आयोगाने उत्तरे दिली नाहीत, मात्र या मुद्द्यांचा विचार केला जाईल, असे सांगितले.

हेही वाचा… पिंपरी: आठ वर्षे झाली, पूल होणार कधी? बोपखेलवासीयांचा सवाल

आयोगाच्या पुण्यातील कार्यालयाला मी भेट दिली. हे कार्यालय एक हजार चौरस फूट देखील नाही. त्यामुळे संग्रहित केलेली माहिती कुठे ठेवणार? त्यामुळे आयोगाला निधी मिळणे आवश्यक आहे. आयोगाला स्वतंत्र जागा देणे महत्वाचे आहे. मागासवर्ग आयोगाला सरकारने केवळ अधिकार, स्वायत्तता देऊन उपयोग नाही. पायाभूत सुविधा, आवश्यक मनुष्यबळ देणे गरजेचे आहे. तरच आयोग चांगल्या पद्धतीने काम करेल. असेही छत्रपती संभाजीराजे यांनी या वेळी सांगितले. संपूर्ण यंत्रणा दिल्याशिवाय आयोगाकडून शास्त्रोक्त पद्धतीने कामकाज होऊ शकणार नाही, असेही संभाजीराजे यांनी स्पष्ट केले.

सामाजिक समतोल राहायला हवा

मराठा, ओबीसी एक राहिले पाहिजे. कोणीही असे वक्तव्य करू नये, जेणेकरून समाजात तेढ निर्माण होईल, असे आवाहन संभाजीराजे यांनी या वेळी केले.