पुणे शहरात लहान मुले पळविणारी टोळी सक्रिय झाली असून समाजमाध्यमावर ध्वनिचित्रफीत प्रसारित करण्यात येत असल्याचे आढळून आले आहे. अशा प्रकारच्या ध्वनिचित्रफितीमुळे पालकांमध्ये भीती पसरली असून अफवांवर पसरविणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
लहान मुले पळवणारी टोळीची अफवा
शहरात गेल्या चार पाच दिवसांपासून लहान मुले पळविणारी टोळी सक्रिय झाल्याची अफवा पसरली आहे. समाजमाध्यमावर ध्वनिचित्रफीत प्रसारित करण्यात येत आहेत. ध्वनिचित्रफितीमुळे पालकांमध्ये घबराट पसरली आहे. अशा प्रकारची अफवा तसेच ध्वनिचित्रफीत प्रसारित करण्यात येणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचा इशारा पुणे पोलिसांनी दिला आहे.
हेही वाचा- वेदान्त- फॉक्सकॉन प्रकल्पावरुन युवासेना आक्रमक; आदित्य ठाकरेंच जनआक्रोश आंदोलन
पोलिसांकडून नागरिकांना आवाहन
पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. अशा प्रकारचे संदेश किंवा ध्वनिचित्रफीत प्रसारित करू नये. नागरिकांना काही अनुचित प्रकार आढळून आल्यास त्यांनी त्वरित पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.