पुणे : सरहद, पुणे आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळातर्फे दिल्ली येथे फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या https://abmssdelhi.org या संकेतस्थळाचे उद्घाटन माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. दिल्लीत ७० वर्षांनंतर होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी शुभेच्छा देऊन हे संमेलन अभूतपूर्व ठरेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

प्रतिभा पाटील यांच्या ९० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‌‘रायगड‌’ या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमास महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, डॉ. सतीश देसाई, ॲड. प्रताप परदेशी, शैलेश वाडेकर, अनुज नहार, संतोष देशपांडे, पाटील यांच्या कन्या ज्योती राठोड उपस्थित होते. प्रा. जोशी यांनी पाटील यांना संमेलनाविषयी माहिती दिली. परिषदेच्या वतीने प्रकाशित अक्षरधन हा ग्रंथ भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. तर सरहदच्या वतीने काश्मीरी गब्बा देऊन शैलेश वाडेकर आणि अनुज नहार यांनी त्यांचा सन्मान केला.

Gantapaswini Mogubai Kurdikar Award announced to Singer Guru Meera Panashikar Pune news
गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर पुरस्कार गायिका-गुरु मीरा पणशीकर यांना जाहीर
Girlfriend murder boyfriend, Pimpri-Chinchwad, murder ,
पिंपरी-चिंचवड: प्रेयसीने मित्रांच्या मदतीने प्रियकराची केली हत्या; प्रियकर…
What causes the rare disorder Guillain Barre Syndrome to occur in Pune news
पुण्यात दुर्मीळ ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’ विकाराची बाधा कशामुळे? रुग्णांच्या तपासणीतून कारण आलं समोर…
Woman stabbed to death with scissors over family dispute in Kharadi area Pune news
पुणे: कौटुंबिक वादातून महिलेवर कात्रीने वार करुन खून; खराडी भागातील घटना, पती अटकेत
rajasthan man arrested in kondhwa for opium sale worth rs 22 lakh
राजस्थानातील एकाकडून २२ लाख रुपयांची अफू जप्त
19 year old girl dies after being hit by dumper accident in baner area
डंपरच्या धडकेत युवतीचा मृत्यू; बाणेर भागात अपघात, दुचाकीस्वार महिला जखमी
Travelling on ST without a smart card is difficult Pune news
‘स्मार्ट कार्ड’विना ‘एसटी’ प्रवास अडचणीचा
Instructions to the pune Municipal Corporation regarding reducing the fine for using plastic bags Pune news
पुणे: प्लास्टिक पिशव्या वापराचा दंड कमी करा, कोणी केल्या महापालिकेला सूचना ?
Retired professor lost jewellery worth Rs 10 lakhs recovered at Khandoba fort in Jejuri Pune news
‘मल्हारी’च्या दारी प्रामाणिकपणाची प्रचिती; जेजुरीच्या खंडोबा गडावर निवृत्त प्राध्यापिकेचे दहा लाखांचे दागिने परत

हेही वाचा – पुणे : कामाचे पैसे मागितल्याने दोघांवर कोयत्याने वार, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाला अटक

हेही वाचा – पुणे : पिस्तूल बाळगणारा मुंबईतील सराइत गजाआड, पिस्तुलासह काडतूस जप्त

संकेतस्थळाची वैशिष्ट्ये

  • संकेतस्थळाची निर्मिती करताना त्याची रचना साधी-सोपी आणि आकर्षक करण्यात आली आहे. संमेलनाविषयी अद्ययावत माहिती, प्रतिनिधी नोंदणी, ग्रंथ दालनाची नोंदणी या संकेतस्थळाद्वारे करता येणार आहे. तसेच मराठी भाषा, महाराष्ट्र आणि दिल्लीचे संबंध यावर प्रकाशझोत टाकणारी छायाचित्रे, व्हिडिओ क्लिप्स, पॉडकास्ट, न्यूज क्लिप्स पाहण्याची सोय आहे.
  • विश्वकोश या विशेष विभागातून मराठी साहित्य आणि साहित्यिकांविषयी माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. संकेतस्थळाच्या माध्यमातून जगभरातील कोट्यवधी मराठी लोकांपर्यंत या संमेलनाविषयीची माहिती पोहोचेल.
  • संकेतस्थळाची निर्मिती संतोष देशपांडे यांच्या मीडियाक्युरा या संस्थेने केली असून मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेचे विशेष सहकार्य लाभले आहे.

Story img Loader