पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. प्रवेश अर्जाचा दुसरा भाग भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिला टप्पा पूर्ण न केलेल्या विद्यार्थ्यांनाही अर्जाचे दोन्ही भाग भरता येणार आहेत.
विद्यार्थ्यांना पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अकरावीची ऑनलाइन केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेश अर्जाच्या दुसऱ्याभागामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्याला मिळालेले गुण, महाविद्यालयाचा कट ऑफ यांची सांगड घालून महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम द्यायचे आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी अर्जाचा पहिला भाग भरलेला नाही, त्या विद्यार्थ्यांना पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील अर्ज एकत्र भरता येणार आहेत. महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम देताना विद्यार्थ्यांनी आपल्याला मिळालेले गुण, ज्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे त्याचा कट ऑफ, महाविद्यालयाचे अंतर, शुल्क, शिकवले जाणारे विषय, विनाअनुदानित किंवा अनुदानित तुकडी या सर्व बाबी लक्षात घेऊन अर्ज भरावा, असे आवाहन अकरावी केंद्रीय समितीने केले आहे. विद्यार्थ्यांना अर्जाबरोबर देण्यात आलेल्या पुस्तकामध्ये महाविद्यालयांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. या वर्षी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अकरावीच्या साधारण ७३ हजार जागा आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक
६ ते १७ जून – ऑनलाइन प्रवेश अर्ज भरणे
७ ते १८ जून – अल्पसंख्याक कोटा, इन हाउस कोटय़ाची प्रवेश प्रकिया
२० जून – कोटय़ातील प्रवेशाच्या गुणवत्ता याद्या
२१ जून – विद्यार्थ्यांना वैयक्तिक माहिती तपासण्यासाठी याद्या
२१ व २२ जून – वैयक्तिक माहितीतील त्रुटी सुधारण्यासाठी मुदत
२७ जून – पहिली गुणवत्ता यादी जाहीर
२७ ते ३० जून – पहिल्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश प्रक्रिया

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The second phase for fyjc admission begins