निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. एकीकडे शिंदे गटाकडून जल्लोष करण्यात येत असताना. दुसरीकडे ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचा विरोध करण्यासाठी पुण्यात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी शिंदे गटाविरोधात आंदोलन केले. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात ठाकरे गटाचे शिवसैनिक सहभागी झाले होते. ‘होय, आम्ही उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंसोबत, भले ही धनुष्य हिरावून घ्याल पण मनुष्य आजही मातोश्रीसोबत’ हा फलक घेऊन शिवसैनिक सहभागी झाले होते. तर हा फलक नागरिकाचे लक्ष वेधून घेत होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- “ठाकरेंनी धनुष्यबाण राष्ट्रवादीकडे गहाण ठेवला होता” म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर; म्हणाल्या, “आरशासमोर…”

यावेळी ठाकरे गटाचे शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले की, केंद्र सरकारच्या दबावाखाली सर्व यंत्रणा काम करीत असून कालचा देखील तसाच निर्णय घेतला आहे. आमचा धनुष्यबाण जरी ४० चोरांनी घेतला असला तरी राज्यातील सर्व जनता आणि आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहे. हे एवढच या सर्व गद्दारानी लक्षात ठेवावं, अशा शब्दात शिंदे गटावर त्यांनी निशाणा साधला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The shivsainiks of the thackeray group protested against the shinde group in pune after election commission decision on shivsena svk 88 dpj