लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: नुकत्याच संपलेल्या हापूस हंगामाला हवामान बदलाचा मोठा फटका बसला. एकूण उत्पादनाच्या जेमतेम वीस टक्केच हापूसचे उत्पादन झाले. त्यामुळे कॅनिंग उद्योगाला आंब्याच्या मोठ्या तुटवड्याचा सामना करावा लागला. कॅनिंगसाठी आंबा जास्त दराने खरेदी करावा लागला, शिवाय अपेक्षित पल्प (प्युरी, रस) उत्पादनही न झाल्यामुळे कॅनिंग उद्योग आर्थिकदृष्ट्या अडचणीत आला आहे.

government banks earned net profit
सरकारी बँकांना सहामाहीत ८६ हजार कोटींचा निव्वळ नफा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
inflation rate declined
किरकोळ महागाई दराची उसंत, नोव्हेंबरमध्ये ५.४८ टक्क्यांवर घसरण
Ration Distribution delayed due to technical difficulties Nagpur news
 ‘सर्व्हर डाऊन’ ! राज्यात स्वस्त धान्य वाटप रखडले…
s and p global ratings
अर्थव्यवस्थेची घोडदौड कायम राहणार – एसअँडपी; नवीन वर्षात मध्यवर्ती बँकेकडून व्याजदर दिलासा शक्य
equity funds investment declined
इक्विटी फंडांतील ओघ ओसरला! नोव्हेंबरमध्ये १४ टक्क्यांनी घटून ३५,९४३ कोटींवर
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?
loksatta readers response loksatta news
लोकमानस : सत्यकथनासाठी निवृत्तीचा मुहूर्त

कोकणातून दरवर्षी साधारणपणे एक लाख तीस हजार टन हापूस आंब्याचे उत्पादन होते. त्यातील सुमारे साठ टक्के म्हणजे ७८ ते ८० हजार टन आंबा खाण्यासाठी देशात आणि परदेशात वापरला जातो. तर सुमारे तीस टक्के म्हणजे पन्नास हजार टन आंबा कॅनिंगसाठी वापरला जातो. यंदा सर्व चित्रच बदलले आहे. कॅनिंगसाठी जेमतेम दहा हजार टन आंबा मिळाला आहे.

हेही वाचा… मे महिन्यात पुण्यात पडला फक्त १९ मिलीमीटर पाऊस

कॅनिंगसाठी कमी आंबा मिळाल्याचा परिणाम म्हणून यंदा कॅनिंगसाठीच्या आंब्याच्या दरात वाढ झाली. सरासरी ३० ते ३५ रुपये किलो दराने दरवर्षी कॅनिंगसाठी आंब्याची खरेदी होत होती. यंदा आंब्याचा मोठा तुटवडा असल्यामुळे कॅनिंगसाठी ७० ते ७५ रुपये किलो दराने आंबा विकत घ्यावा लागला. दर वाढूनही पुरेसा आंबा कॅनिंगसाठी मिळाला नाही.

हेही वाचा… मोसमी वाऱ्यांची वाटचाल खोळंबली; १६ जूनपासून मोसमी वारे तळ कोकणातच

आंब्याच्या मोठ्या तुटवड्यामुळे अपेक्षित पल्प (प्युरी, रस) उत्पादन झाले नाही. आर्थिक गुंतवणूक सरासरी इतकी होऊनही अपेक्षित उत्पादन न झाल्यामुळे कॅनिंग उद्योगाचे आर्थिक गणित कोलमडले आहे. कॅनिंग उद्योगातील प्रस्थापित व्यावसायिकांवर याचा फारसा विपरीत परिणाम झाला नाही. मात्र, नव्याने उद्योगात आलेल्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

हेही वाचा… ‘या’ उपकरणामुळे मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश

चिपळूण तालुक्यातील कौंढर ताम्हाणे येथील तरुण कॅनिंग व्यावसायिक अमोल भागवत म्हणाले, मी नव्याने उद्योग सुरू केला आहे. मुळात स्वतःच्या बागेत कॅनिंगसाठी फारसा आंबा निघाला नाही. दुसऱ्यांकडून खरेदी करावा, तर यंदा उच्चांकी दर होते. इतक्या दराने आंबा खरेदी करून कॅनिंग करावा, तर वाढीव दराने विक्री होईल की नाही, या बाबतचा अंदाज येत नव्हता. त्यामुळे अपेक्षित उत्पादन झाले नाही. परिणामी माझ्या सारखे नव उद्योजक अडचणीत आले आहेत.

वर्षभर जाणविणार पल्पचा तुटवडा

यंदा कॅनिंगसाठी अपेक्षित प्रमाणात आंबा मिळाला नाही. वाढीव दराने आंबा खरेदी करावा लागला. उत्पादन खर्च वाढूनही अपेक्षित पल्प उत्पादन झाले नाही. त्यामुळे बाजारात वर्षभर पल्पचा काहीसा तुटवडा असेल, शिवाय दरही तेजीत असतील, असे देसाई प्रॉडॉक्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमर देसाई यांनी सांगितले.

Story img Loader