पुण्यातील मावळ हे भात शेतीचे माहेर घर आहे अस हमखास म्हटलं जातं. मावळात एकूण साडेतेरा हजार हेक्टरवर भाताची लागवड करण्यात आली आहे. भात पीक जोमात असताना सध्या त्यावर खोड कीड आणि पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कृषी अधिकारी विकास गोसावी यांनी वर्तविली आहे. म्हणूनच भात शेतात कामगंध सापळे लावले जात आहेत. आता तुम्ही म्हणाल काम गंध सापळे म्हणजे काय? तेच जाणून घेऊयात.
पुण्याच्या मावळमध्ये भात शेतकऱ्यांसाठी समाधानकारक पाऊस झाला आहे.

शेतकरी देखील सुखावलेला आहे. पण, सध्या कधी ऊन, पाऊस, थंड हवा आणि ढगाळ वातावरण यामुळं शेतकरी चिंतेत आहे. अशा वातावरणामुळं भात पिकांवर रोगराई पसरण्याची भीती असते. त्याअगोदरच पूर्व तयारी म्हणून मावळ चे कृषी अधिकारी विकास गोसावी यांनी मावळमधील प्रगतशील शेतकरी शंकर कळविट, नवनाथ कुडले यांच्या शेतात कामगंध सापळे बसविले आहेत. कामगंध सापळे म्हणजे काय? भात पिकांवर खोड कीड लागण्याची शक्यता सध्याच्या वातावरणामुळे असते.

Solapur jowar crops loksatta news
सोलापूर : ज्वारीच्या कोठारात यंदा ज्वारीचा पेरा निम्म्यावर, लांबलेल्या पावसाचा परिणाम
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Property tax defaulters properties seized in Titwala
टिटवाळा येथे कर थकबाकीदारांच्या दोन कोटीच्या मालमत्तांना टाळे, पालिकेच्या अ प्रभागाची कारवाई
Ration Distribution delayed due to technical difficulties Nagpur news
 ‘सर्व्हर डाऊन’ ! राज्यात स्वस्त धान्य वाटप रखडले…
Illegal building on road in Nandivali Samarth Chowk demolished
मानपाडा-बाह्यवळण रस्ता ते कोपर रस्त्यामधील अडथळा दूर
centre attempts to revive farm reforms unveils draft policy
शेतीमालाच्या विक्री धोरणाबाबत केंद्राची पुन्हा घाई; सूचना, हरकतींसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी
clean up marshal action against those responsible for littering
क्लीन अप मार्शलकडून अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा; पालिकेच्या तिजोरीत आठ महिन्यांत ३ कोटी दंड जमा
Sugarcane Cultivation Kolhapur , Sugarcane ,
लोकशिवार… मुरमाड जमिनीतील उसाची दमदार लागवड

हेही वाचा : पुण्याचे पुरंदर विमानतळ जुन्याच जागी ; उपमुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती

कामगंध सापळ्यात ल्युअर गोळ्यांना खोड किडीच्या मादीचा गंध दिला जातो, तो भात शेतात मधोमध सापळा लावतात. भात पिकावर खरच रोगराई झाली असेल तर नर खोड किडे गोळ्यांवरील मादीच्या वासाच्या दिशेने आकर्षित होऊन त्या सापळ्यात अलगद अडकतात. अशाच पद्धतीने काही किडे यात अडकल्यास भात पिकावर रोगराई होण्याची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांना औषध फवारणी करण्याचा सल्ला दिला जातो. अस मावळ कृषी अधिकारी विकास गोसावी यांनी सांगितलं आहे. अगदी माफक दरात कामगंध सापळा मिळतो. तो कृषी सेवा केंद्रात देखील उपलब्ध आहे. दोन गोळ्या 90 रुपये तर सापळा 65 रुपयांना मिळतो. 

Story img Loader