पुणे : एनडीए (चांदणी) चौकातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून (नॅशनल हायवेज ॲथॉरिटी ऑफ इंडिया – एनएचएआय) उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम अंतिम टप्प्यात असताना महापालिकेने तीन महिन्यांपूर्वी तयार केलेला पौड-वारजे बाह्य सेवा रस्ता कोणतीही कल्पना न देता रातोरात खोदला आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतूककोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विनापरवानगी रस्ता खोदल्याने एनएचएआयने महापालिकेला नोटीस काढण्याची कार्यवाही सुरू केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबई-बंगळुरू महामार्गावर प्रामुख्याने एनडीए चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. या पार्श्वभूमीवर एनएचएआयने गेल्या काही वर्षांपासून या परिसरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी पर्यायी उपाययोजना हाती घेत त्यावर कामाला सुरुवात केली आहे. तसेच चांदणी चौकातील जुना उड्डाणपूल पाडून या ठिकाणच्या रस्त्याची रुंदी वाढवून नवीन उड्डाणपुलाचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पांतर्गत महामार्गालगत बावधन, वारजे, कोथरूड परिरातील स्थानिक नागरिकांसाठी बाह्यवळण रस्ते नव्याने तयार केले आहेत. हे बाह्यवळण रस्ते तयार करण्यापूर्वी एनएचएआयने महानगरपालिका, भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल), महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल), महावितरणसह सर्व संबंधित यंत्रणांना जलवाहिन्या आणि त्यांच्या इतर सेवा वाहिन्या स्थलांतरित करण्याबाबत वारंवार कळविले होते. याबाबत पत्रव्यवहारही केला होता. याकरिता दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. दोन महिन्यांच्या कालावधीनंतर एनएचएआयने बाह्यवळण रस्त्यांची कामे हाती घेत हे रस्ते पूर्ण केले.

हेही वाचा – पुणे : मित्राशी वाद झाल्याने महाविद्यालयीन तरुणाची वसतिगृहत गळफास घेऊन आत्महत्या

महामार्गालगतच्या सेवा रस्त्यांमध्ये पौड परिसरातून वारजेकडे जाण्यासाठी (एकेरी) बाह्य सेवा रस्ता तयार करण्यात आला आहे. तीन महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर महापालिकेला समान पाणीपुरवठा योजनेच्या कामांबाबत कल्पना आल्यानंतर रात्री ठेकेदार कंपनीने एनएचएआयची परवानगी न घेता श्रृंगेरी मठासमोरील २० मीटर रस्ता खोदला. सकाळी ही बाब एनएचएआय अधिकाऱ्यांच्या दृष्टिक्षेपात आल्यानंतर त्यांनी संबंधित कामाबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मात्र, अधिकाऱ्यांकडून कुठलाच योग्य प्रतिसाद मिळाला नसून, महापालिकेने हे काम सुरूच ठेवले आहे. त्यामुळे नव्या उड्डाणपुलाचे गर्डर टाकण्याच्या कामासाठी वाहतुकीचा अडथळा निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे उड्डाणपुलाच्या कामास आणखी विलंब होण्याची शक्यता नाकारता येत नसून, महापालिकेला नोटीस काढण्यात येणार असल्याचे एनएचएआयकडून सांगण्यात आले.

महापालिकेकडून रस्ता खोदण्यात आलेला नाही. समान पाणीपुरवठ्यासाठी रस्त्याचा काही भाग खोदण्यात आला आहे. – व्ही. जी. कुलकर्णी, पथ विभागप्रमुख

हेही वाचा – मुंढव्यात ज्येष्ठ नागरिकाचा खून करणाऱ्या कोयता गँगची पोलिसांनी काढली धिंड

पूर्ण रस्ता खोदण्यात आलेला नाही. रस्त्याचा काही भाग खोदण्यात आला आहे. या ठिकाणी झीरो व्हेलॉसिटी व्हॉल्व्ह बसवायचा आहे. बाणेर-बालेवाडीच्या भागाला कमी पाणीपुरवठा होतो. त्यामुळे वारज्यापासून बाणेर, बालेवाडी येथील टाक्यांपर्यंत जलवाहिनी टाकण्यात येत आहे. हा रस्ता नव्याने केलेला असला, तरी महापालिकेचे काम महत्त्वाचे असल्याने हे काम करणे आवश्यक होते. हा रस्ता पूर्ववत करून देण्याची ग्वाही एनएचएआयला दिली आहे. – अनिरुद्ध पावसकर, पाणीपुरवठाप्रमुख