पुणे : राज्य मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या गुणपत्रिका, स्थलांतर प्रमाणपत्र, तपशिलवार गुण दर्शविणारे कनिष्ठ महाविद्यालयीन अभिलेख यांचे वाटप सोमवारी (३ जून) करण्यात येणार आहे. गुणपत्रिका, स्थलांतर प्रमाणपत्र मिळाल्यावर विद्यार्थ्यांचा पुढील अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले. बारावीच्या परीक्षेच्या गुणपत्रिका, स्थलांतर प्रमाणपत्र, तपशिलवार गुण दर्शविणारे कनिष्ठ महाविद्यालयीन अभिलेख यांचे वाटप सोमवारी (३ जून) सकाळी अकरा वाजता विभागीय मंडळांकडून कनिष्ठ महाविद्यालयांना करण्यात येणार आहे. कनिष्ठ महाविद्यालयांनी त्याच दिवशी दुपारी तीन वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रिका, स्थलांतर प्रमाणपत्रांचे वाटप करायचे आहे. त्यानुसार विभागीय मंडळ स्तरावर नियोजन करावे. विभागीय मंडळ कार्यकक्षेतील उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना या बाबतची माहिती द्यावी, तसेच त्याची राज्य मंडळाला पाठवण्याबाबतचे निर्देश विभागीय मंडळ सचिवांना देण्यात आले.

हेही वाचा – “मी नार्को टेस्ट करायला तयार, पण नंतर तिने…”; अजित पवारांचे अंजली दमानियांना सडेतोड प्रत्युत्तर!

हेही वाचा – मोसमी पाऊस २४ तासांत केरळात

पदवी, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी गुणपत्रिका, स्थलांतर प्रमाणपत्र अशी कागदपत्रे आवश्यक असतात. विविध अभ्यासक्रमांसाठी घेतल्या जाणाऱ्या समाईक प्रवेश परीक्षेच्या निकालानंतर प्रत्यक्ष प्रवेशावेळी ही कागदपत्रे महाविद्यालयाला सादर करावी लागतात. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयांकडून गुणपत्रिका, स्थलांतर प्रमाणपत्र मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांचा पुढील प्रवेशाचा मार्ग मोकळा होणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The state board has given information regarding the distribution of 12th mark sheets pune print news ccp 14 ssb
Show comments