पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली त्याच दिवशी या घटनेतील मुख्य साक्षीदाराचा जबाब नोंदविण्यात आला, अशी साक्ष डेक्कन पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम. एस. जोशी यांनी न्यायालयात दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येची सुनावणी विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात सुरू आहे. या प्रकरणात डेक्कन पोलीस ठाण्यातील तत्कालिन वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम. एस. जोशी यांची साक्ष केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीबीआय) विशेष सरकारी वकील प्रकाश सुर्यवंशी यांनी नोंदवली.

हेही वाचा <<< “देवेंद्रजी, माझ्या घरात जशी एक मुलगी, तशी तुमच्या घरातदेखील…”, उर्फी जावेद प्रकरणावरुन सुप्रिया सुळेंचे वक्तव्य

२० ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी सहायक पोलीस निरीक्षक साळुंके यांनी ओंकारेश्वर पुलावर एका व्यक्तीची गोळ्या घालून हत्या झाल्याची माहिती मला दिली. मी चिंचवडला राहात असल्याने घटनेची माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी दाखल झालो. साळुंके यांनी घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली. तत्कालिन पोलीस उपायुक्त मकरंद रानडे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

हेही वाचा <<< थंडी वाढणार, आरोग्य सांभाळा डॉक्टरांचे नागरिकांना आवाहन

दोन पंचाना बोलावून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला, अशी साक्ष पोलीस निरीक्षक एन. एस. जोशी यांनी दिली, असे सीबीआयचे विशेष सरकारी वकील ॲड. प्रकाश सूर्यवंशी यांनी सांगितले. बचाव पक्षाचे वकील ॲड. प्रकाश साळशिंगीकर यांनी जोशी यांची उलटतपासणी घेतली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The statement main witness dabholkar murder case on the day pune print news rbk 25 ysh