पुणे : ऑनलाइन पद्धतीने उत्पादनांची विक्री करणाऱ्या एका प्रसिद्ध कंपनीचा वितरक असल्याच्या बतावणीने व्यावसायिकाची एक कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ऑनलाइन उत्पादन विक्री करणाऱ्या कंपनीकडून स्वस्तात उत्पादने मिळवून देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाची फसवणूक करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

याबाबत एका व्यावसायिकाने लोणी काळभोर पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी चैतन्य उर्फ अंकित ‌भाऊसाहेब पाटील (वय ३४, रा. कळंबी, ता. मिरज, जि. सांगली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यावसायिकाची आरोपी पाटीलशी ओळख झाली होती. गृहोपयोगी, इलेक्ट्राॅनिक्स वस्तूंसह दैनंदिन वापरातील विविध वस्तूंची कंपनीकडून स्वस्तात विक्री करण्यात येणार असल्याचे पाटीलने व्यावसायिकाला सांगितले. सांगली जिल्ह्यातील अनेकांना स्वस्तात दुचाकी, मोबाईल संच, दूरचित्रवाणी संच, फ्रिज, सोन्याची बिस्कीटे, टायर अशा अनेक वस्तू स्वस्तात मिळवून दिल्याचे पाटीलने त्यांना सांगितले होते.

A six days old baby girl sold by her parents for Rs 90 000 in Ulhasnagar
उल्हासनगरमध्ये सहा दिवसाच्या बाळाची आई, वडिलांकडून ९० हजार रूपयांना विक्री
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Fraud of pretext of loan approval Pune
पिंपरी: कर्ज मंजुरीच्या बहाण्याने सव्वा कोटीची फसवणूक
fake investment apps news in marathi
हे गुंतवणुकीचे नव्हे, फसवणुकीचे मार्ग
Raid on service center that is committing online fraud under the guise of providing loans Mumbai print news
मुंबईः कर्ज देण्याच्या नावाखाली ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या सेवा केंद्रावर छापा; ७ जणांना अटक
Malegaon software scam loksatta news
मालेगाव प्रकरणी सॉफ्टवेअर आयातीच्या नावाखाली व्यवहार, अमेरिका, सिंगापूर, यूएईमधील कंपन्यांना कोट्यवधीची रक्कम पाठवली
Crime against the then board of directors of Swami Samarth Sugar Factory Solapur news
स्वामी समर्थ साखर कारखान्याच्या तत्कालीन संचालक मंडळाविरुद्ध गुन्हा; तारण साखरेची विक्री, सोलापूर जिल्हा बँकेची फसवणूक
online fraud with Bank officer on name of share trading
शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली बँक अधिकाऱ्याचीच ऑनलाईन फसवणूक

हेही वाचा – डॉ. प्रदीप कुरुलकर विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी एटीएस कार्यालयाबाहेर काँग्रेस पक्षाचे आंदोलन

व्यावसायिकाला सुरुवातीला आरोपीने स्वस्तात लॅपटाॅप, मोबाईल संच दिले. त्यांना एका सराफी पेढीतील दहा तोळ्यांचे सोन्याचे दागिने पाटीलने दिले. पाटीलने व्यावसायिकाला कमी किंमतीत १८ लाख रुपयांच्या वस्तू दिल्या होत्या. व्यावसायिकाला जाळ्यात ओढून पाटीलने वेळोवेळी एक कोटी २१ लाख रुपये उकळले. मोठी रक्कम मिळाल्यानंतर पाटीलने त्यांना वस्तू उपलब्ध करून दिल्या नाहीत. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक तरटे तपास करत आहेत.

Story img Loader