चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक लढवण्यास ठाकरे गटाचे पदाधिकारी आग्रही झाले आहेत. ठाकरे गट देखील पोटनिवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहे. आम्ही पोटनिवडणूक लढवणार आहोत. शेवटी पक्षश्रेष्ठी निर्णय घेईल. असे ठाकरे गटाचे शहराध्यक्ष सचिन भोसले यांनी सांगितले आहे. महाविकास आघाडीबाबत पक्षश्रेष्ठी ठरवतील. पण आमची चिंचवड विधानसभा मतदारसंघात ताकद आहे. त्यामुळे त्या ताकदीचा उमेदवार आम्ही या पोटनिवडणुकीत देणार असल्याचे भोसले म्हणाले.
भाजपाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्याने चिंचवड विधानसभा पोटनिवडुक जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादी, काँग्रेस, आप पाठोपाठ आता ठाकरे गटाने देखील चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक लढवण्यास आग्रही आहे. नुकतीच ठाकरे गटाची बैठक पार पडली. आपण चिंचवड विधानसभा लढवावी, निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी देण्यात यावी. असे मत बैठकीत कार्यकर्त्यांनी मांडले अशी माहिती ठाकरे गटाचे शहराध्यक्ष सचिन भोसले यांनी दिली आहे. शेवटी पक्षश्रेष्ठी ठरवेल पण आम्ही कामाला लागलो आहोत. महाविकास आघाडीचा उमेदवार दिल्यास त्याचे काम करू असे ही विधान भोसले यांनी केले आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सर्वच पक्ष आग्रही आहेत. भाजपाकडून अद्याप ही चिंचवड विधानसभेचा जाहीर करण्यात आला नाही. दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आश्विनी जगताप किंवा बंधू, शंकर जगताप यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.