पीएमपी प्रवासी महिलेच्या पिशवीतून रोकड आणि मंगळसूत्र असा ७५ हजार रुपयांचा ऐवज लांबविला.याबाबत एका महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला मूळची साताऱ्यातील आहेत. ती आळंदी ते महापालिका भवन या मार्गावरील बसने प्रवास करत होती. त्या वेळी बसमध्ये गर्दी होती. चोरट्यांनी महिलेच्या पिशवीतून ६०० रुपये तसेच मंगळसूत्र असा ७६ हजार ६०० रुपयांचा ऐवज लांबविला. सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर तपास करत आहेत.

हेही वाचा >>> पुणे : औंधमध्ये पादचारी ज्येष्ठाचा दुचाकीच्या धडकेने मृत्यू

शहरात गेल्या काही महिन्यांपासून पीएमपी प्रवाशांकडील ऐवज लांबविणाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गणेशोत्सवात मोठ्या संख्येने परगावाहून नागिरक येतात. शहरातील पीएमपी स्थानकांच्या परिसरातून नागरिकांचे मोबाइल लांबविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

Story img Loader