राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (एनसीएल) आवारातून चोरट्यांनी चंदनाची पाच झाडे चोरट्यांनी कापून नेल्याची घटना उघडकीस आली.याबाबत एनसीएलचे सुरक्षा अधिकारी सुरेश पालीवाल (वय ४६) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. एनसीएलच्या आवारात मध्यरात्री चंदन चोरटे शिरले. चोरट्यांनी आवारातील चंदनाची पाच झाडे करवतीने कापली.

झाडांचे बुंधे पोत्यात भरुन चोरटे पसार झाले. एनसीएलचे आवार विस्तीर्ण आहे. चोरटे सीमाभिंतीवरुन उडी मारुन आवारात शिरले. आवारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण ताब्यात घेण्यात आले असून पोलीस कर्मचारी मोमीन तपास करत आहेत.

Story img Loader