मौजमजा करण्यासाठी अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने अलिशान बंगल्यात चोरी करणाऱ्याला कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केली असून त्याच्या अल्पवयीन साथीदारालाही ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणून दहा लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.गणेश तिमन्ना साखरे (वय २१, रा. रेणुका वस्ती, नॉर्थ रस्ता, कोरेगाव पार्क ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी करीम एहसानअली धनानी यांनी फिर्याद दिली आहे.

धनानी यांचा कोरेगाव पार्क परिसरातील गल्ली क्रमांक सातमध्ये लिबर्टी सोसायटीमध्ये बंगला आहे. कामानिमित्त ते १८ जुलै रोजी मुंबईला गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या बंगल्याच्या खिडकीतून आतमध्ये प्रवेश केला. दोन एलईडी टीव्ही, दोन पॉवर स्पीकर, स्पीकर, ॲम्प्लिफायर, बुम बॉक्स, सुरोज बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या ऑफिसमधील एलईडी टीव्ही असा ऐवज चोरी केला. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच कोरेगाव पार्क पोलिसांनी तपासाला गती देत चोरट्याला अटक केली.

Story img Loader