मुकाई-किवळे चौकात चक्क वाहतूक पोलीस उपयुक्तांनी स्वतःच खड्ड्यांची डागडुजी केली आहे. किवळे-मुकाई चौकात नेहमीच वाहनांची वर्दळ असते. तिथून शेकडो वाहने ही पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर जात असतात. परंतु काही प्रमाणात असलेले खराब रस्ते आणि खड्ड्यांमुळे इथे गेले काही दिवस वाहतूक कोंडी होते आहे. तेथील एक खड्ड्या चक्क पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी स्वतः वॉर्डनला खडी आणून बुजवला आणि डागडुजी केली. त्यांच्या या कृतीचं चांगलंच कौतुक होताना दिसत आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे- मुंबई द्रुतगती मार्गाला मुकाई किवळे या भागातून अनेक वाहन जातात. काही खड्ड्यामूळ वाहनांचा वेग कमी होऊन या परिसरात गेली काही दिवस मोठी वाहतूक कोंडी होत आहे. याचा ताण वाहतूक पोलिसांवर येतो असून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागत आहे. तिथे असलेल्या एका खड्ड्याची पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी खडी, माती आणून डागडुजी केली, वाहतूक पोलिसांनी देखील त्यांना मदत केली. त्यांच्या या कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे. एकीकडे पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या हद्दीत रस्ते गुळगुळीत असले तरी मुकाई चौक रावेत या भागातली परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळं इथले काही रस्ते दुरुस्ती करण्याची मागणी वाहनचालक करत आहेत. 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The traffic congestion due to potholes was filled by the deputy commissioner of traffic police kjp