पुणे: सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत करण्यासाठी लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता, तसेच फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्त्यावर पुणेकरांची मोठी गर्दी होते. यापार्श्वभूमीवर वाहतूक शाखेने रविवारी (३१ डिसेंबर) सायंकाळी पाचनंतर लष्कर आणि डेक्कन जिमखाना भागात वाहतूक बदल केले आहेत.

मध्यरात्री गर्दी ओसरेपर्यंत या परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली. लष्कर भागातील वाहतूक बदल पुढीलप्रमाणे- वाय जंक्शनकडून महात्मा गांधी रस्त्याकडे येणारी वाहतूक १५ ऑगस्ट चौक येथे बंद करून वाहतूक कुरेशी मशीद आणि सुजाता मस्तानी चौकाकडे वळविण्यात येणार आहे. इस्काॅन मंदिराकडून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर रस्ता, तसेच अरोरा टाॅवर्सकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. व्होल्गा चौकातून महंमद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक इस्ट स्ट्रीटवरुन इंदिरा गांधी चौकाकडे वळविण्यात येणार आहे. इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक लष्कर पोलीस ठाण्याकडे वळविण्यात येणार आहेे. सरबतवाला चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे.

Kalgitura play selected at Bharangam International Festival in New Delhi
दिल्लीतील भारंगम आंतरराष्ट्रीय महोत्सवात नाशिकचा ‘कलगीतुरा’
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Thane, Chitrarath, Constitution, New Year Swagat Yatra,
ठाणे : यंदाच्या नववर्षे स्वागत यात्रेत ‘संविधान’ विषयावर चित्ररथ
Traffic jam due to closure of road leading from Shaniwar Chowk towards Mandai Pune news
शनिवारची सुट्टी वाहतूक कोंडीत… कोठे घडला प्रकार?
Mumbai, FDA, FDA Special inspection, FDA inspection restaurants Mumbai,
मुंबई : नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर ‘एफडीए’ सतर्क; हॉटेल, रेस्टॉरंट, क्लबमध्ये विशेष तपासणी मोहीम सुरू
Lakshmi Road closed to traffic on the occasion of Pedestrian Day Pune news
पादचारी दिनानिमित्त लक्ष्मी रस्ता वाहतुकीस बंद
pipeline laying work, Pune-Solapur route, traffic on Pune-Solapur route,
जलवाहिनी टाकण्याच्या कामामुळे आजपासून पुणे-सोलापूर मार्गावरील वाहतुकीत बदल
Saturn-Venus gochar 2024
आजपासून शनी-शुक्र देणार नुसता पैसा ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य

हेही वाचा… पिंपरी: तळवडे दुर्घटनेतील मृतांच्या वारसांचा टाहो; घरातली कमावती माणसे गेली, सरकार मदत देणार कधी?…

फर्ग्युसन रस्ता आणि जंगली महाराज रस्त्यावरील वाहतूक बदल पुढीलप्रमाणे- कोथरुड आणि कर्वे रस्त्याकडून येणारी वाहतूक खंडोजीबाबा चौक येथे बंद करण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक विधी महाविद्यालय रस्ता, प्रभात रस्ता, अलका चित्रपटगृहाकडे वळविण्यात येणार आहे.

जंगली महाराज रस्त्यावर होणारी गर्दी विचारात घेऊन झाशीची राणी चौकातून वाहतूक बंद करण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक गोखले स्मारक चौक, उपरस्ते, पुणे महापालिका भवन, ओंकारेश्वर मंदिर, छत्रपती शिवाजी रस्तामार्गे वळविण्यात येणार आहे.

महात्मा गांधी रस्ता, फर्ग्युसन रस्ता वाहनांसाठी बंद

लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता परिसरात रविवारी (३१ डिसेंबर) सायंकाळी पाचनंतर वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. महात्मा गांधी रस्त्यावरील १५ ऑगस्ट चौक ते अराेरा टाॅवर्स चौक दरम्यान वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. फर्ग्युसन रस्त्यावरील गोखले स्मारक चौक ते फर्ग्युसन महाविद्यालय प्रवेशद्वारापर्यंत वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. पहाटे पाचपर्यंत वाहनांना बंदी राहणार आहे.

Story img Loader