पुणे : कर्वे रस्त्यावरील वाहतूककोंडी टाळण्यासाठी स्थानिक व्यावसायिकांना“कॅरेज वे’मध्ये वाहने लावण्यास परवानगी द्यावी, असे आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिका आणि पोलिसांना सोमवारी दिले. स्थानिक व्यावसायिक आणि नागरिकांच्या सूचनेनुसार ज्या ठिकाणी वाहतूककोंडी होत नाही, तेथील नो पार्किंगचे फलक काढण्याची सूचनाही त्यांनी केली. तसेच गरवारे महाविद्यालयाजवळ महापालिकेच्या मोकळ्या जागेत स्वतंत्र सशुल्क वाहनतळ उभारण्यासही पाटील यांनी सांगितले.

वनाज ते गरवारे दरम्यान मेट्रो आणि नळस्टॉप चौकातील उड्डाणपुलाची कामे संपल्यामुळे कर्वे रस्त्यावर दुतर्फा वाहने उभी करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी या रस्त्यावरील स्थानिक व्यावसायिकांनी केली होती. मनसेचे सरचिटणीस हेमंत संभूस यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधून तोडगा न काढल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी बैठक झाली.

Deportation of 101 criminals within Maval Vidhan Sabha Constituency Police Station limits Pune news
मावळचे वातावरण तापले! तालुक्यातून १०१ गुन्हेगार हद्दपार
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Due to assembly elections instructions have issued regarding school continuity on November 18 19
शाळा सुरू ठेवण्याबाबत शिक्षण आयुक्तांच्या सुधारित सूचना… होणार काय?
Supreme Court orders MHADA to submit details of flats grabbed by developers Mumbai print news
विकासकांनी हडपलेल्या सदनिकांची माहिती असमाधानकारक ! पुन्हा माहिती सादर करण्याचे ‘म्हाडा’ला आदेश
congress rajya sabha mp abhishek manu singhvi at loksatta loksamvad event
आरक्षणावर सर्वोच्च न्यायालय विरुद्ध सारे राजकीय पक्ष
99 Accused from Nagpur City Tadipaar Assembly Election 2024
निवडणुकीच्या धामधुमीत ९९ आरोपी तडीपार…गेल्या १० वर्षात पहिल्यांंदाच…
Supreme Court on bulldozer action (1)
अतिक्रमणविरोधी कारवाईवेळी ‘हे’ नियम पाळा, थेट सर्वोच्च न्यायालयानंच घालून दिली नियमावली!

हेही वाचा >>> ‘जीएसटी’च्या उत्पन्नावर पुणे महापालिकेचा डोलारा; मिळकतकरात घट होण्याची शक्यता

महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डाॅ. कुणाल खेमनार, रवींद्र बिनवडे, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, कोथरुड वाहतूक पोलीस निरीक्षक विश्वास गोळे, फेडरेशन ऑफ ट्रेड असोसिएशनचे अध्यक्ष फतेचंद रांका, ओमप्रकाश रांका, हेमंत संभूस, विनिता ताटके, प्रियंका पिसे, रोहित गुजर, संतोष पाटील, केदार कोडोलीकर, आकाश बुगडे, राहुल वानखडे, भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा >>> Maharashtra Breaking News Live: “कलानगरातली काही बेडकं…”, चित्रा वाघ यांचं खोचक ट्वीट; म्हणाल्या, “आता पावसाळा आलाय!”हेही वाचा >>>

कर्वे रस्त्यावरील खंडुजीबाबा चौक ते करिष्मा सोसायटी दरम्यानचा रस्ता ६० फुटांचा असल्याने यापूर्वी दुतर्फा वाहने उभी करण्यास महापालिका आणि पोलिसांची परवानगी होती. या रस्त्यावर वनाज ते गरवारे मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू झाले. त्यापाठोपाठ नळस्टॉप चौकातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून उड्डाणपुलाचेही काम सुरू झाले. या दोन्ही प्रकल्पांचे काम आता पूर्ण झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावरील पार्किंग पूर्ववत करावे, अशी तेथील व्यावसायिकांची मागणी केली होती.

हेही वाचा >>> पुणेकरांसाठी लॉटरी : मिळकतकर मुदतीत भरा; एक कोटीची बक्षिसे घ्या!

कर्वे रस्त्यावरील वाहतूककोंडी टाळून कॅरेज वे उपलब्ध आहे, अशा भागांमध्ये वाहने पार्किंगला परवानगी द्यावी. तसेच, व्यावसायिक आणि नागरिकांच्या सूचनेनुसार ज्या ठिकाणी वाहतूककोंडी होत नाही, अशा ठिकाणी वाहतूक पोलिसांनी पाहणी करून नो पार्किंगचे फलक काढून, व्यावसायिक आणि स्थानिक नागरिकांची समस्या सोडवावी, असे पाटील यांनी सांगितले. गरवारे महाविद्यालयाच्या विरुद्ध बाजूस महापालिकेच्या जागेवर वाहने पार्किंगसाठी सशुल्क वाहनतळ सुरू करावे. त्यासाठी कंत्राटी पद्धतीने व्यवस्था उभी करावी, असेही पाटील यांनी सांगितले.