केंद्रीय विद्यापीठातील पदवीपूर्व अभ्यासक्रमासाठीच्या केंद्रीय विद्यापीठ प्रवेश परीक्षेचा निकाल जूनच्या तिसऱ्या आठवड्यात, पदव्युत्तर पदवी परीक्षेचा निकाल जुलैच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल. देशभरातील विद्यापीठांनी पदवी आणि पदव्युत्तर पदवी प्रवेश प्रक्रिया जुलैमध्ये पूर्ण करून १ ऑगस्टपासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>पुणे: पीएमपीच्या पास केंद्रातून दहा हजारांची रोकड चोरीस; विश्रांतवाडी भागातील घटना

राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणामार्फत (एनटीए) होणाऱ्या सीयूईटीच्या पार्श्वभूमीवर यूजीसीचे सचिव प्रा. रजनीश जैन यांनी परिपत्रकाद्वारे माहिती दिली. केंद्रीय विद्यापीठे आणि अन्य विद्यापीठांमध्ये पदवी-पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी सीयूईटी येत्या २१ ते ३१ मे या कालावधीत घेण्यात येणार आहे. त्यासाठी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. पदव्युत्तर पदवीसाठी जूनच्या पहिल्या किंवा दुसर्‍या आठवड्यात पदव्युत्तर पदवीच्या प्रवेशासाठी सीयूईटी होईल. साधारण एक हजार परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात येणार आहे. एका दिवशी ४५० ते ५०० केंद्रांचा वापर करण्यात येईल. विद्यार्थ्यांना इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू आणि उर्दू या भाषांचा पर्याय उपलब्ध असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.