पुणे: कृत्रिम प्रज्ञा (एआय) तंत्रज्ञानाचा वापर आता बांधकाम क्षेत्रातही सुरू झाला आहे. अगदी संभाव्य ग्राहक शोधण्यापासून ते घरांची त्रिमितीय रचना करण्यापर्यंत या तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला आहे. बांधकाम प्रकल्पासाठीची मंजुरी, कागदपत्रे यांचीही माहिती या माध्यमातून सहजपणे मिळू लागली आहे. ‘द चॅटर्जी ग्रुप’ने पुण्यासह महाराष्ट्रातील बांधकाम व्यावसायिकांसाठी ‘सिरस.एआय’ या अॅप्लिकेशनच्या (उपयोजन) माध्यमातून या गोष्टी प्रत्यक्षात उतरवल्या आहेत.

कृत्रिम प्रज्ञेमुळे गृहखरेदीचा पूर्ण अनुभव बदलून जाणार आहे. घराची खरेदी ही जलद, अधिक प्रभावी पद्धतीने आणि सोयीस्कर होणार आहे. याबाबत ‘सिरस.एआय’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी सौविक बॅनर्जी म्हणाले की, बांधकाम क्षेत्रात परिपूर्ण सेवा देण्याच्या हेतूने आम्ही हे पाऊल उचलले आहे. यातून बांधकाम व्यावसायिकांना ग्राहक शोधण्यापासून ते घर ग्राहकांच्या ताब्यात देण्यापर्यंतच्या गोष्टी सहजपणे शक्य होतील. बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात चौकशी करणाऱ्या ग्राहकांच्या केवळ आवाजावरून कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञान हे कोणता ग्राहक घर खरेदी करण्याची शक्यता जास्त याबाबत आडाखे बांधू शकते. त्यानुसार बांधकाम व्यावसायिकाचा विक्री विभाग पुढील नियोजन करू शकते.

Important update regarding Raigad Fort Project to build Shiv Srushti at Pachad gains momentum
रायगड किल्ल्या संदर्भात महत्त्वाची अपडेट… पाचाड येथील शिवसृष्टी उभारणीच्या प्रकल्पाला गती
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
artificial intelligence
कुतूहल : चुकांची जबाबदारी निश्चित करण्याचे आव्हान!
How will state boards mobile app be useful for students parents and teachers
राज्य मंडळाचे मोबाइल अॅप विद्यार्थी, पालक, शिक्षकांना कसे ठरणार उपयुक्त?
ai complexity
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता नियमनाची किचकट प्रक्रिया
positive artificial intelligence
कुतूहल : भारताला गरज सकारात्मक कृत्रिम बुद्धिमत्तेची!
Revealing Interview Yuval Noah Harari Problem Crisis Artificial Intelligence
सशक्तदेखील स्वत:ला ‘बळी’ म्हणवतात, ही आजची समस्या!
Loksatta kutuhal The journey of artificial intelligence in India
कुतूहल: भारतात कृत्रिम बुद्धिमत्तेची वाटचाल

हेही वाचा >>>“दिवट्या आमदार…”, पुण्यातील आमदारावर शरद पवारांची टीका; म्हणाले, “राष्ट्रवादीच्या नावाने…”

मोठ्या बांधकाम व्यावसायिकांकडे गृहप्रकल्पांची त्रिमितीय रचना करणाऱ्या बाह्य संस्था असतात. मध्यम आणि छोट्या व्यावसायिकांना हे परवडत नाही. ‘सिरस.एआय’ उपयोजनामध्ये बांधकाम व्यावसायिकाचे कर्मचारी केवळ काही मिनिटांत घरांची त्रिमितीय रचना तयार करू शकतील. याचबरोबर माहितीपत्रके तसेच, इतर प्रसिद्धी साहित्यही हे कर्मचारी या उपयोजनाच्या माध्यमातून बनवू शकतील. यासाठी त्यांना बाह्य संस्थेला पैसे देण्याची आवश्यकता असणार नाही. याचबरोबर गृहप्रकल्पाशी निगडित कागदपत्रांची माहितीही या उपयोजनातून मिळेल, असे बॅनर्जी यांनी सांगितले.

गृहनिर्माण क्षेत्रात कृत्रिम प्रज्ञेमुळे बदल…

– संभाव्य ग्राहकांचा शोध

– घरांची त्रिमितीय रचना

– ग्राहकांना घरांचा दृकश्राव्य अनुभव

– बाजारपेठेशी निगडित गोष्टींची माहिती

– प्रत्यक्ष निर्णय प्रक्रियेत मदत

– बांधकाम प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा

Story img Loader