पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्मा जलसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेला ६२.९१ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. त्या तुलनेने सध्या धरणामध्ये ३३.४३ टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.

गेल्या वर्षी पवना धरणामध्ये ६२.९१ टक्के इतका पाणीसाठा असल्याने पिंपरी-चिंचवडकरांना चिंता करण्याची गरज नव्हती. परंतु, यावर्षी जुलैचा महिना सरत आला तरी पवना धरणातील जलसाठा निम्म्यावरही पोहोचलेला नाही. म्हणून पिंपरी-चिंचवडकरांच्या चिंतेत भर पडली आहे.

Petrol and Diesel Prices on 27 December
Petrol And Diesel Prices : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! तुमच्या शहरांत एक लिटरसाठी किती रुपये मोजावे लागतील?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Air quality in Borivali and Malad is dangerous
बोरिवली, मालाडची हवा धोकादायक, महिन्यातील जवळपास वीस दिवस बहुतेक भागांत वाईट हवेची नोंद
Water supply to Ulhasnagar Ambernath Badlapur closed for 24 hours
बारवीच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात दुरूस्ती; उल्हासनगरसह अंबरनाथ, बदलापुरातील पाणी पुरवठा २४ तास बंद
Borivali air, Air pollution Mumbai, Air pollution Borivali,
बोरिवलीची हवा ‘अतिवाईट’, मुंबईत हवा प्रदूषणाचे सत्र सुरूच
Water supply to Kalyan Dombivli cities to be cut off for 18 hours on Thursday
कल्याण-डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा गुरुवारी अठरा तास बंद
Thane district water, MIDC, MIDC water scheme ,
ठाणे जिल्ह्याचे पाणी महागणार ? एमआयडीसीची पाणी योजना तोट्यात, दर वाढवण्याच्या हालचाली
khambataki ghat tunnel work loksatta news
खंबाटकी घाटातील नवीन बोगदा अंतिम टप्प्यात, पुणे – बंगळूरू महामार्गाचे दळणवळण होणार गतिमान

हेही वाचा – पिंपरी पालिका यशवंतराव चव्हाण स्मारकासाठी पाच कोटी रुपये देणार

पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणामध्ये ३३.४३ टक्के इतका जलसाठा उपलब्ध असल्याचं समोर आलेले आहे. एक जूनपासून पवना धरणातील पाणीसाठ्यात १५.५३ टक्के वाढ झालेली आहे. गेल्या वर्षी आजतागायत ६६० मिलिमीटर पाऊस झाला होता. जो यावर्षीच्या तुलनेत काही प्रमाणात कमी आहे. यावर्षी धरण क्षेत्रात ७३६ मिलिमीटर इतका पाऊस झालेला आहे.

हेही वाचा – पिंपरी : महापालिकेचा फतवा… मालमत्ता कर भरा, नाहीतर जप्ती!

असं असलं तरी गेल्यावर्षी आजच्या तारखेला पवना धरणामध्ये ६२.९१ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. परंतु, यावर्षी केवळ ३३.४३ टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध असल्याचं पुढे आलं आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी आजच्या तारखेला निम्मा जलसाठा असल्याचं बघायला मिळत आहे. एक जूनपासून ते आजतागायत ३३६ मिलिमीटर पाऊस झालेला आहे.

Story img Loader