पुणे: महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांतील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सूस, म्हाळुंगे, लोहगाव आणि वाघोली या गावांसाठी पाणीपुरवठा आराखडा केला आहे. या अंतर्गत सूस-म्हाळुंगे येथे ११० कोटी रुपये खर्च करून साठवणूक टाक्यांची उभारणी करण्यात येणार आहे, तर लोहगाव आणि वाघोली येथे २३४ कोटींची पाणी योजना राबविण्यात येणार आहे. त्यामुळे या गावांतील पाणी समस्या मार्गी लागेल, असा दावा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या सूस, म्हाळुंगे आणि बावधन या भागात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या आहे. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने सूस, म्हाळुंगे, बावधन, लोहगाव आणि वाघोली येथील पाणी समस्या दूर करण्यासाठी आराखडा तयार केला होता. त्याअंतर्गत सूस, म्हाळुंगे गावात साठवणूक टाक्यांची उभारणी करण्यात येणार आहे.

हेही वाचा… ‘रिपाइं’च्या शहराध्यक्षपदासाठी चुरस; ‘हे’ उमेदवार इच्छुक

म्हाळुंगे येथील सध्याच्या पाण्याच्या साठवणूक टाकीची क्षमता साडेचार लाख दशलक्ष लिटर एवढी आहे. तर सूस येथील सध्या अस्तित्वातील पाण्याच्या टाकीची क्षमता अडीच लाख दशलक्ष लिटर एवढी आहे. या संपूर्ण भागासाठी केवळ दोनच साठवणूक टाक्या असल्याने नव्या सहा टाक्यांची उभारणी करण्याचे नियोजित आहे. या सहा टाक्यांमुळे एक कोटी ४० लाख दशलक्ष लिटर एवढे पाणी साठविले जाणार आहे. सध्या या भागात दररोज ७५ टँकरच्या फेऱ्या होत साठवणूक टाक्यांमुळे टँकरवरील अवलंबित्वही कमी होणार आहे. म्हाळुंगे येथे चार आणि सूस येथे दोन साठवणूक टाक्यांची उभारणी होणार आहे. या सर्व कामांसाठी ११० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

हेही वाचा… आषाढी एकादशीनिमित्त पुण्यात गुरूवारी नियमित पाणीपुरवठा

लोहगाव आणि वाघोली येथेही २३४ कोटींची पाणी योजना हाती घेण्यात आली आहे. या प्रस्तावित पाणी योजनेलाही महापालिकेच्या अंदाज समितीने मान्यता दिली आहे. त्यामुळे निविदाप्रक्रिया राबवून या गावांत पाणी योजना कार्यान्वित करण्यास गती मिळणार आहे.

महापालिका हद्दीत समावेश झालेल्या गावांपैकी लोहगांव आणि वाघोलीतील लोकसंख्या जास्त असल्याने या भागात पाणीटंचाई जाणवत असल्याने लोहगांव, वाघोली गावांसाठी पाणी योजना महापालिका प्रशासनाकडून तयार करण्यात आली होती. या दोन्ही गावांचे क्षेत्रफळ ५० चौरस किलोमीटर आहे. पुढील ३० वर्षांचा म्हणजे २०५२ पर्यंतचा विचार करून ११२ दशलक्ष लिटर क्षमतेचा हा प्रकल्प होणार आहे. या भागाला भामा आसखेड धरणातून पाणी पुरवठा करण्यात येईल. त्यासाठी १३ साठवणूक टाक्या, ४३२ किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या टाकल्या जाणार आहेत. लोहगाव-वाघोली गावाच्या पाणी पुरवठा योजनेचा खर्च २३४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The water supply department of the municipal corporation has claimed that the water problem in the affected villages will be solved pune print news apk 13 dvr