लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे: जिल्हा परिषदेच्या जागेत झालेल्या अतिक्रमणावर कारवाईसाठी गेलेल्या ग्रामसेवक महिलेला धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना लाेणी काळभोरमधील नायगाव परिसरात घडली. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

भाऊसाहेब चंद्रकांत चौधरी (वय ५०, रा. नायगाव, ता. हवेली, जि. पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत ग्रामसेवक विजया दत्तात्रय भगत (वय ४२) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नायगाव ग्रामपंचायत परिसरात प्राथमिक आराेग्य केंद्र आहे. या परिसरात सीमाभिंत बांधण्यासाठी जिल्हा परिषदेने दहा लाख रुपये मंजूर केले आहेत.

हेही वाचा… आंबेगाव तालुक्यातील राष्ट्रवादीची दिलीप वळसे पाटील यांना साथ

चौधरी यांनी जिल्हा परिषदेच्या जागेवर अतिक्रमण केल्याने ग्रामसेवक विजया भगत आणि पथक तेथे गेले होते. चौधरी यांनी ग्रामसेवक भगत आणि पथकातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. अतिक्रमण कारवाईस विरोध करुन सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक घोडके तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The woman gramsevak who went to take action on the encroachment of the zilla parishad premises was pushed in pune print news rbk 25 dvr