समाज ज्या दृष्टिकोनातून महिलेला पाहात आहे, त्याबाबत प्रबोधन होणं फार गरजेचं आहे. बाजारूपणाची वृत्ती समाजामध्ये वाढली आहे. प्रत्येक स्त्रीला वस्तू म्हणून पाहिलं जातं आहे. ही विकृती खालच्या पातळीला घेऊन जाणारी आहे, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जनमानसात संतापाची लाट आहे. मी असं म्हणणार नाही, की हैदराबादच्या पार्श्वभूमीवर एनकाउंटर व्हावं. मात्र, कायद्याच्या चौकटीत राहून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, ही आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

चाकणकर म्हणाल्या, एक महिला म्हणून वाटतं जसा गुन्हा तशी शिक्षा व्हावी. काल पीडित मुलीला आणि तिच्या आईला भेटल्यानंतर अंगावर शहारे यावेत एवढी भयानक स्थिती होती. महिला, युवती, महाविद्यालयीन विद्यार्थीनींवर अत्याचार अन्याय होतील त्याठिकाणी समुपदेशाबरोबर तात्काळ मदत देण्याचं धोरण आम्ही अवलंबत आहोत. हैदराबाद येथील घटना घडल्यानंतर उमटलेले पडसाद त्यानंतर यवतमाळ, नागपूर, औरंगाबाद व पनवेल येथे घडलेल्या घटना असतील, या संबंधित घटनांमधील आरोपींचा खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा अशी मागणी गृहमंत्र्यांकडे केली आहे. तसेच, पाच वर्षांमध्ये महाराष्ट्र व देश बलात्कार आणि महिलांवरील अत्याचाऱ्याच्या घटनांमध्ये अग्रक्रमांकावर राहिला हे दुर्दैव असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.

मागील पाच वर्षांच्या काळात ज्यांच्याकडे गृहखात होतं ते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अपयशी ठरले आहेत. पाच वर्षात महिला धोरणासाठी कोणतीच ठोस भूमिका त्यांनी घेतली नाही. त्यावेळेस सुरू असलेल्या दक्षता कमिटी त्यांनी बंद पाडल्या, यामुळे महिलांना सुरक्षा मिळाली नाही. असा आरोपही रुपाली चाकणकर यांनी यावेळी केला.