पुणे: जेवण तयार न केल्याने महिलेला बेदम मारहाण करुन तिचा खून करण्यात आल्याची घटना कात्रज भागातील दत्तनगर परिसरात घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी पतीला अटक केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मधुरा तानाजी कांबळे (वय ४२, रा. स्वामी समर्थनगर, दत्तनगर, कात्रज) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती तानाजी शिवाजी कांबळे (वय ४३) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत मुलगा पियूष तानाजी कांबळे (वय १९) याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तानाजी मजूरी करतो. त्याला दारु पिण्याचे व्यसन आहे. रात्री दहाच्या सुमारास तो घरी आला. जेवण तयार न झाल्याने तो पत्नी मधुरा यांच्यावर चिडला. त्याने पत्नीला लाथबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मारहाणीत मधुरा गंभीर जखमी झाल्या.

हेही वाचा… नाताळानिमित्त लष्कर भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल, जाणून घ्या काय होणार…

बेशुद्धावस्थेतील मधुरा यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पत्नीचा खून केल्याप्रकरणी तानाजीला अटक करण्यात आली असून, सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील पाटील तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The woman was beaten and killed by her husband for not preparing food pune print news rbk 25 dvr