पुणे : जमीन खरेदी-विक्रीचा दस्तावरून सातबारा उताऱ्यावर नोंद घेणे, वारस नोंद करणे, मयताचे नाव कमी करणे, बोजा दाखल किंवा कमी करणे, विश्वस्तांचे नाव बदलणे आदी कामांचे फेरफार नोंदविण्यासाठी नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने किंवा तलाठी कार्यालयात प्रत्यक्ष अर्ज दाखल करावा लागतो. तलाठी त्या नोंदीचा फेरफार करून तो मान्यतेसाठी मंडल अधिकारी यांच्याकडे ऑनलाइन पाठवितो. मात्र काही तलाठ्यांकडून फेरफार जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवले जातात. वाद किंवा हरकत नसेल, तर नियमानुसार एक महिन्यात या दोन्ही नोंदी झाल्या पाहिजेत. मात्र, काही तलाठी, मंडल अधिकारी यांच्याकडून जाणीवपूर्वक अडथळा निर्माण केला जात असल्याची तक्रार सार्वत्रिक आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मात्र, आता भूमि अभिलेख विभागाने तलाठी आणि मंडल अधिकारी यांच्या कामाची चौकट निश्चित केली आहे. त्यामुळे आपण केलेला अर्ज तलाठ्याने पाहिला की नाही? आपल्या अर्जावर कोणी हरकत घेतली आहे का? तलाठ्याने आपला अर्ज मंडल अधिकाऱ्याकडे पाठविला आहे की नाही? या सर्व कामांवर आता वॉच ठेवता येणार आहे.

हेही वाचा – पुणे : काय सांगता? डेक्कन परिसरातील झाडे बोलू लागली?

हेही वाचा – पुणे लोकसभा पोटनिवडणूक घ्या, मुंबई उच्च न्यायालयाचे केंद्रीय निवडणूक आयोगाला आदेश

भूमि अभिलेख खात्याने दाखल झालेल्या गावनिहाय प्रलंबित फेरफारची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/aaplichawdi/ या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. संकेतस्थळावर गेल्यानंतर जिल्हा, तालुका, गाव हे निवडावे लागणार आहे. तसेच सातबारा फेरफार, मालमत्ता पत्रक (फेरफार) किंवा मोजणी नोटीस या पैकी एक पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर सर्च केल्यानंतर सर्व माहिती स्क्रीनवर दिसणार आहे. त्यामुळे कोणती नोंद कधी मंजूर केली, कोणती नोंद प्रलंबित आहे, आपल्या अर्जाच्या आधी कोणाची नोंद मंजूर केली आहे, हे नागरिकांना समजणार आहे. त्यामुळे तलाठी, मंडल अधिकाऱ्यांच्या कामकाजात पारदर्शकता येणार असून वशिलेबाजीला लगाम बसणार आहे. तसेच अर्जाच्या क्रमाने (पहिला आलेला अर्ज आधी निकाली काढणे) तलाठी यांच्याकडील फेरफर नोंद मंजूर होईल, असे जमाबंदी आयुक्त निरंजन सुधांशू यांच्याकडून सांगण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The work of talathi mandal officers can now be monitored land records department made the website available pune print news psg 17 ssb