पिंपरी: महापालिकेच्या वतीने नेहरूनगर येथे उभारण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडिअमचे काम प्रगतीपथावर आहे. हे काम डिसेंबरअखेर पूर्ण होणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्थापत्य क्रीडा विभागाच्या सुरू असलेल्या कामांच्या स्थळांची पाहणी खोराटे यांनी केली. तसेच, इतर कामांची माहिती घेऊन उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावीत, अशा सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. भोसरी, इंद्रायणीनगर येथील संत ज्ञानेश्वर क्रीडांगणामधील लॉन टेनिसच्या पूर्ण झालेल्या कामाची माहिती घेतली. लवकरात लवकर काम पूर्ण करावे, असा आदेश त्यांनी दिला.

हेही वाचा… एकाच दिवशी पिंपरीतील तीन बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाचे छापे

भोसरी सर्व्हे क्रमांक एक येथील क्रीडा संकुलामधील कामाची पाहणी खोराटे यांनी केली. पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण करून विविध खेळण्यांसाठी मैदान उपलब्ध करून द्यावे. तसेच, कुस्ती प्रशिक्षण केंद्रामध्ये ठिकठिकाणी तैलचित्र लावावे, या सूचना त्यांनी दिल्या. बहिणाबाई चौधरी सर्पोद्यान आणि प्राणिसंग्रहालयासही त्यांनी भेट दिली. स्वामी विवेकानंद क्रीडा संकुल, कृष्णानगर येथील लॉन टेनिसच्या पूर्ण झालेल्या कामाची पाहणी केली. नेमबाजी केंद्राचे काम येत्या दोन महिन्यांत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The work of the international standard major dhyan chand hockey stadium constructed at nehrunagar is in progress pune print news ggy 03 dvr