लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून (नॅशनल हायवेज ॲथॉरिटी ऑफ इंडिया – एनएचएआय) एनडीए (चांदणी) चौकात उभारण्यात येत असलेल्या नव्या उड्डाणपुलाचे उद्घाटन केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते १२ ऑगस्टला करण्यात येणार आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून, या कामाची मंगळवारी (११ जुलै) जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पाहणी केली.

loksatta satire article on uddhav thackeray chopper checking
उलटा चष्मा : तपासण्यांची उड्डाणे
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
pune four pistols and two bikes seized
कोंढव्यात तिघांकडून चार पिस्तुले, दोन दुचाकी जप्त
Narendra Modi Kharghar, Narendra Modi latest news,
पंतप्रधानांच्या आगमनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत सरकारची स्वच्छ खारघर मोहीम सुरूच
Roads Kharghar, Narendra Modi meeting,
पंतप्रधानांच्या सभेमुळे खारघरचे रस्ते चकाचक
Heavy police presence on the occasion of Prime Minister narendra modis visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त कडक पोलीस बंदोबस्त
four pistols seized pune
पुणे: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सराइतांकडून चार पिस्तुले जप्त, पोलिसांकडून तिघे अटकेत

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी कामाची पाहणी करून नवीन व्हीओपीच्या सद्य:स्थितीतील कामाबद्दल, चौकातील इतर कामाबद्दल आढावा घेतला. एनएचएआयचे प्रकल्प संचालक संजय कदम, प्रकल्प व्यवस्थापक श्रीनिवास, प्रकल्प समन्वयक किशोर भरेकर, एनएचएआय सल्लागार अभियंता भारत तोडकरी, सुरक्षा अधिकारी कुंदन कुणाल आदी या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा… पिंपरी-चिंचवडमध्ये महाविकास आघाडीकडून उमेदवारांसाठी शोधाशोध

एनडीए चौक हा पुण्यातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. या ठिकाणाहून पाच वेगवेगळे मार्ग जातात. गेल्या वर्षभरात प्रकल्पाचे बरेचसे काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पातील मुख्य अडचणी म्हणजे रखडलेले भूसंपादन, सेवा वाहिन्यांचे स्थलांतर, न्यायालयीन प्रकरणे आणि स्थानिक अतिक्रमण आदींवर मात करत गतीने काम पूर्ण करण्यात येत आहे. सध्या पुलाचे गर्डर टाकण्याचे काम सुरू आहे. पुढील महिन्यात उड्डाणपुलाचे लोकार्पण करण्याचे नियोजन असून, त्या दृष्टीने कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सांगितले.

हेही वाचा… पुणे: नर्तिकेच्या घरातून १३ लाखांचा ऐवज चोरणारा गजाआड

व्हीओपी कामांतर्गत स्तंभाच्या तुळईचे (बिम ऑफ कॉलम) काम पूर्ण झाले आहे. दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यावरील एकूण ३२ गर्डरपैकी (गर्डर लांबी २२ ते ३५ मी) २५ गर्डरचे काम पूर्ण झाले आहे. मुख्य रस्त्यावरील नऊपैकी पाच गर्डरचे (गर्डरची लांबी ५७.५ मी) काम पूर्ण झाले असून उर्वरित काम प्रगतिपथावर आहे. सेवा रस्त्याच्या चार स्पॅनचे स्लॅब पूर्ण झाले आहेत. मुख्य रस्त्यावरील स्लॅब बांधणीचे काम सुरू असून, इतर कामे प्रगतिपथावर आहेत, असेही जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा… पुणे जिल्ह्यातील ४७ गावांत पाणीटंचाई; खासगी टँकरचालकांची चलती

एनडीए चौक प्रकल्पाचे एकूण ९५ टक्के काम पूर्ण झाले असून, लवकरच काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे, असे एनएचएआयचे प्रकल्प संचालक कदम यांनी सांगितले, तर नव्या उड्डाणपुलाचे सर्व गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाले असून, प्लॅस्टर करण्याचे काम बाकी आहे. हे काम महिनाअखेरीस पूर्ण होईल. १२ ऑगस्टला केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्याचे नियोजित आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित राहतील, असे एनएचएआयचे सल्लागार अभियंता भारत तोडकरी यांनी सांगितले.