पुणे : पुणे विमानतळावर मागील काही काळापासून प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या गर्दीमुळे अनेक पायाभूत सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे चित्र आहे. यामुळे प्रवासी वारंवार तक्रारी करताना दिसतात. लवकरच प्रवाशांची ही गैरसोय बंद होणार आहे. कारण पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनलचे काम पूर्णत्वाकडे पोहोचले आहे. ते सप्टेंबरपासून कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे विमानतळावरील नवीन एकात्मिक टर्मिनलचे काम पूर्ण होत आले आहे. हे टर्मिनल पूर्णपणे वातानुकूलित असणार आहे. त्यात प्रवाशांसाठी पाच पादचारी पूल असतील. याचबरोबर ३४ चेक-इन काऊंटर असतील. तसेच, बॅगांसाठी इन-लाईन बॅगेल हँडलिंग सिस्टिम असेल. या टर्मिनलमध्ये २७ हजार चौरस फुटांमध्ये पादचारी उड्डाणपूल आणि विक्री केंद्रांसोबत प्रवाशांसाठी सर्व अत्याधुनिक सुविधा असतील. नवीन टर्मिनल सप्टेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत ४७५ कोटी रुपये आहे.

Vashi toll plaza toll exemption traffic congestion mumbai entryways
टोलमुक्तीनंतरही कोंडी कायम, वाशी टोलनाक्यावर दोन्ही प्रवेशमार्गांवर वाहतुकीचा ताण
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Confusion due to incorrect announcements in running local trains
पुढील स्थानक ‘चुकीचे’! धावत्या लोकल गाड्यांमधील चुकीच्या उद्घोषणांमुळे संभ्रमावस्था
Gold, charas, ganja, Mumbai airport,
मुंबई विमानतळावर सोने, चरस, गांजा जप्त
Why are indigenously made Dhruva helicopters frequently involved in accidents
स्वदेशी बनावटीच्या ध्रुव हेलिकाॅप्टर्सचे वारंवार अपघात का होत आहेत?
Nagpur airport loksatta news
नागपूर विमानतळ विस्तार, प्रशासन मिशन मोडवर
yard remodeling trains
नागपूर : यार्ड रि-मॉडेलिंगसाठी दिल्ली मार्गावरील काही रेल्वेगाड्या रद्द
MIDC accelerates Rs 650 crore flyover works including alternative roads in Hinjewadi IT Park
हिंजवडी आयटी पार्क लवकरच ‘कोंडी’मुक्त! पर्यायी रस्त्यांसह उड्डाणपुलाच्या ६५० कोटींच्या कामांना एमआयडीसीकडून गती

हेही वाचा – मिनिटभर गाडी चालवा, पक्के वाहन परवाने घ्या!

नवीन टर्मिनलच्या बांधकाम आणि विद्युतीकरणाचे काम ३० जूनपर्यंत होण्याची शक्यता आहे. यानंतर जुलैमध्ये नवीन टर्मिनलची चाचणी सुरू होणार आहे. जुनी इमारत आणि नवीन इमारत एकमेकांशी जोडली जाणार आहे. पादचारी पुलांद्वारे या दोन्ही इमारती जोडल्या जातील. पुण्याचे सांस्कृतिक ओळख दाखवणारी ही नवीन इमारत असेल. नवीन टर्मिनल सुरू झाल्यानंतर विमानतळाची प्रवासी क्षमता जवळपास दुपटीने वाढणार आहे.

हेही वाचा – “नाना पटोलेंनी उद्धव ठाकरेंना न विचारता विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, त्यामुळे…”, अजित पवारांचा गंभीर आरोप

विमानतळावर एप्रिलमध्ये ७.६ लाख प्रवासी

पुणे विमानतळावर एप्रिलमध्ये ७ लाख ६६ हजार ४०२ प्रवाशांनी ये-जा केली. विमानतळावर आगमन आणि उड्डाण झालेल्या विमानांची संख्या ५ हजार ४७ आहे. याबाबत भारतीय विमानतळ प्राधिकरणाने म्हटले आहे की, पुणे हे आधुनिकता आणि सांस्कृतिक वारशासाठी प्रसिद्ध आहे. औद्योगिक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात हे शहर पुढे वाटचाल करीत आहे. ऐतिहासिक, धार्मिक स्थळे आणि महत्त्वाच्या कार्यालयांमुळे पुण्यात येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे.

Story img Loader