पुणे: बहुचर्चित कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाच्या कामाला गती मिळणार असून टिळेकरनगर ते खडी मशीन या दरम्याची दीड एकर जागा महापालिका प्रशासनाच्या ताब्यात आली आहे. जागा मालकाकडून तडजोडीने भूसंपादन करण्यात आले आहे. महत्त्वाच्या टप्प्यातील जागा ताब्यात आल्याने रस्ता रुंदीकरणाचे काम वेगाने होईल, असा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

कात्रज-कोंढवा रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी भूसंपादन करावे लागणार असून, त्यासाठी जागामालकांची यादी महापालिका प्रशासनाकडून तयार करण्यात आली आहे. भूसंपादनाअभावी रस्ता रुंदीकरणाचे काम संथ गतीने सुरू आहे. भूसंपादनापोटी प्रकल्पबाधितांकडून रोख रकमेची आग्रही मागणी केली जात आहे. त्यासाठी राज्य शासनाने २०० कोटींचा निधी मंजूर केला आहे. मात्र, हा निधी अद्यापही महापालिकेला मिळालेला नाही.

Pune Municipal Corporation construction department issued notices to 125 construction projects in the city and stopped work Pune print news
पुणे: बांधकाम बंद ठेवण्याच्या नोटिशींचा ‘फार्स’ ?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Pune railway station, Pune railway station waiting time,
पुणे : रेल्वे प्रवाशांचा स्थानकावरील प्रतिक्षाकाळ कमी होणार, आराखडा अंतिम टप्प्यात
pune speed breakers
पुण्यातील ‘इतके’ स्पीड ब्रेकर काढणार ? कारण काय
butibori flyover collapse
बुटीबोरी पुल खचल्यावर सरकारला जाग, सुरक्षा ऑडिटबाबत फडणवीस गडकरींशी चर्चा करणार
holiday rush leads to traffic congestion on highway in maharashtra
सुट्ट्यांमुळे महाकोंडी; सर्वच महामार्गांवर वाहनांची प्रचंड गर्दी, खंडाळा घाटात १०-१२ किलोमीटरपर्यंत रांगा
Subsidy e-rickshaw Pimpri, Pimpri municipal corporation,
पिंपरी : ई-रिक्षाधारकांना ३० हजार रुपये अनुदान; काय आहे महापालिकेचा उपक्रम?
traffic jam at Khandala Ghat , traffic jam Mumbai Pune Expressway,
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटात प्रचंड वाहतूक कोंडी; दहा ते बारा किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा

पालकमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात वेगाने भूसंपादन करावे, अशी सूचना महापालिकेला केली आहे. मात्र, दीड महिन्यात केवळ सात मिळकतींचे भूसंपादन झाले होते. टिळेकर नगर ते खडी मशीन या महत्त्वाच्या टप्प्यातील जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून पाठपुरावा सुरू होता. त्यानुसार जागा मालक प्रकाश धारिवाल यांच्यासमवेत चर्चा सुरू होती. त्यांनी तडजोडीने जागा ताब्यात देण्यासाठी सहकार्य केल्याने ही जागा महापालिकेच्या ताब्यात आली आहे. त्यामुळे रस्ता रूंदीकरण वेगाने होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा… ललित पाटीलच्या अमली पदार्थ व्यवसायात ॲड. प्रज्ञा कांबळे सामील

कात्रज-कोंढवा रस्त्याचे गेल्या पाच वर्षांत केवळ २८ टक्के काम पूर्ण झाले आहे. रस्ता रुंदीकरणासाठी २ लाख ८८ हजार चौरस मीटर जागा आवश्यक असून, अद्याप १ लाख २८ हजार चौरस मीटर जागेचे भूसंपादन झालेले नाही. कात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी ७०० कोटींची आवश्यकता आहे. निधीअभावी रस्त्याचे काम रखडले आहे. या रस्त्यांच्या रुंदीकरणाला मंजुरी देताना रस्त्याची रुंदी ८४ मीटर एवढी प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र, आता रस्त्याची रुंदी ५० मीटर एवढी करण्यात येणार आहे. त्यामुळे रस्त्यासाठी भूसंपादनही कमी करावे लागणार असून, त्यासाठी २७७ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी दोनशे कोटींचा निधी राज्य शासनाने महापालिकेला द्यावा, असा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला होता. हा प्रस्ताव राज्य शासनाकडून मंजूर झाला आहे. मात्र, निधी प्राप्त झालेला नाही.

Story img Loader