पुणे : लोन ॲपच्या माध्यमातून तीन हजार रुपयांचे कर्ज घेणे एका तरुणीला चांगलेच महागात पडले. तीन हजार रुपयांचे कर्ज घेतल्यानंतर बदनामी करण्याची भीती दाखवून तरुणीकडून एक लाख ११ हजार रुपये उकळण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी लष्कर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 याबाबत एका तरुणीने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तरुणीला तातडीने तीन हजार रुपयांचे गरज होती. तिने मोबाइलवरुन लोनॲपच्या माध्यमातून तीन हजार रुपयांचे कर्ज घेतले. तरुणीच्या खात्यात तीन हजार रुपये जमा करण्यात आले. त्यानंतर एकाने तरुणीच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तरुणीला धमकावण्यास सुरुवात केली. तिची बदनामी करण्याची धमकी दिली. अश्लील संदेश आणि छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी दिली.

PMC Bank Scam Hearing on petitions of aggrieved account holders on December 12 mumbai news
पीएमसी बँक घोटाळा; पीडित खातेधारकांच्या याचिकांवर १२ डिसेंबरला सुनावणी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
300 crore extortion from female officer on fear of involvement in embezzlement Mumbai print news
३०० कोटींच्या गैरव्यवहारातील सहभागाची भीती दाखवून महिला अधिकाऱ्याकडून खंडणी उकळली; चौघांविरोधात गुन्हा
indian rupee falls to all time low against us dollar
अग्रलेख : काका… मला वाचवा!
public banks profit increase by 26 percent in first half fy 25
सरकारी बँकांच्या नफ्यात सहामाहीत २६ टक्के वाढ
Shah Rukh Khan News
शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला छत्तीसगडमधून अटक; ५० लाखांची मागितली होती खंडणी
supreme court rejects sebi penalty on mukesh ambani In rpl shares case
सर्वोच्च न्यायालयाचा मुकेश अंबानींना दिलासा; ‘आरपीएल शेअर्स’प्रकरणी ‘सॅट’च्या आदेशाला सेबीचे आव्हान फेटाळले!

हेही वाचा >>> पिंपरी चिंचवडकरांना दिलासा; गृहनिर्माण सोसायट्यांसाठी कृती आराखडा

आरोपीने धमकावून तरुणीकडून वेळोवेळी एक लाख ११ हजार रुपये उकळले. तरुणीने घाबरून वेळोवेळी पैसे दिले. अखेर तरुणीने लष्कर पोलीस ठाण्यात धाव घेतली. लष्कर पोलिसांनी एका मोबाइल वापरकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक प्रियंका शेळके तपास करत आहेत. काही महिन्यांपूर्वी लोनॲपच्या माध्यमातून कर्ज देण्याच्या बहाण्याने नागरिकांनी धमकावल्याच्या घटना शहरात घडल्या हाेत्या. लोनॲपच्या माध्यमातून अनेकांची फसवणूक करण्यात आली होती. लोनॲपच्या धमक्यांमुळे शहरात दोघांनी आत्महत्या केली होती.सायबर पोलिसांनी लोनॲपच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला अटक केली होती.