खर्च वाढतोय वेगाने; ‘लाभार्थ्यां’चे संगनमत?
पिंपरी पालिकेने उच्चभ्रू व उच्चशिक्षितांची मोठी वसाहत असलेल्या प्राधिकरणात भव्य नाटय़गृह उभे करण्याची प्रक्रिया २०१३ मध्ये सुरू केली. सुरुवातीपासून त्याचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. आणखी वर्ष-दीड वर्षे तरी काम पूर्ण होण्याची कोणतीही शक्यता नाही. एकीकडे काम संथ असले तरी खर्च मात्र वेगाने वाढतोय आणि त्याचा फायदा संगनमताने घेतला जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो आहे.
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या मुख्य इमारतीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अडीच एकर क्षेत्रात हे नाटय़गृह होणार आहे. मूळची प्राधिकरणाची ही जागा नाटय़गृहासाठी महापालिकेकडे हस्तांतर करण्यात आली. या बहुद्देशीय प्रकल्पात तीन इमारती असणार आहेत. पहिल्या इमारतीत ८५० आसनक्षमता असलेले मोठे नाटय़गृह होणार असून, त्यात नाटके, सांस्कृतिक उपक्रम होतील. दुसऱ्या इमारतीत २५० क्षमतेचे छोटे सभागृह होणार आहे. लहान मुलांचे कार्यक्रम, एकांकिका स्पर्धा आदींसाठी त्याचा उपयोग होणार आहे. या ठिकाणी स्वतंत्र कलादालन, उपाहारगृह, सभागृह, महत्त्वाच्या व्यक्तींसाठी कक्ष, दुहेरी वाहनतळ आदींचे नियोजन आहे. २०१३ मध्ये या प्रकल्पास मंजुरी देण्यात आली. प्रकल्पाचे वास्तुविशारद म्हणून पी. के. दास यांची निवड करण्यात आली. सुरुवातीला ३७ कोटींचा खर्च निर्धारित करण्यात आला होता. नंतर त्यात वाढ करण्यात आल्याचे सांगण्यात येते. २०१४ मध्ये प्रत्यक्ष काम सुरू झाले. नोव्हेंबर २०१७ पर्यंत ते पूर्ण होणे अपेक्षित आहे, मात्र अगदी सुरुवातीपासून संथगतीने सुरू असलेले हे काम या मुदतीत पूर्ण होणे शक्य नाही. आतापर्यंत ६५ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा पालिकेचे अधिकारी करत असले तरी प्रत्यक्ष जागेवर तसे दिसत नाही. आतापर्यंत २१ कोटी रुपये ठेकेदाराला अदा करण्यात आले आहेत. काम पूर्ण होण्यास आणखी दीड वर्षांचा कालावधी लागू शकतो, असे जाणकार सांगतात. संथपणे काम सुरू ठेवून खर्च वाढवत नेण्याचा प्रयत्न या ठिकाणी दिसून येतो. यामध्ये अनेक जण लाभार्थी आहेत. प्राधिकरणात नाटय़गृह होणार म्हणून आनंदात असलेल्या सांस्कृतिकप्रेमी नागरिकांचा आता हिरमोड झाला आहे. नाटय़गृह कधी पूर्ण होणार, असा प्रश्न विचारून नागरिक थकले, मात्र काम पूर्ण होण्याची चिन्हे नाहीत. असाच वेग सुरू राहिल्यास ‘बिरबलाची खिचडी’ आणि नाटय़गृहाची उभारणी यात फरक नसेल, अशी सूचक टिप्पणी एका ज्येष्ठ नागरिकाने केली आहे.
काम संथ सुरू आहे, यात तथ्य असले तरी खर्च वाढत नाही. निर्धारित खर्चात काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. काम पूर्ण व्हायला आणखी वर्षभराचा कालावधी लागेल. वाहनतळाचे अतिरिक्त काम करावे लागले, त्यात वेळ व पैसे खर्च झाले. ठेकेदाराचा फायदा होईल, असे बिलकूल प्रयत्न सुरू नाहीत. याउलट, संथ काम केल्याप्रकरणी ठेकेदारास ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. – अंबादास चव्हाण, शहर अभियंता, पिंपरी पालिका
उशिराची कारणे
- नाटय़गृहाचे आराखडे वेळत सादर करण्यात आले नाहीत
- वाहनतळाच्या कामात खडक लागल्याने काम वाढले
- नोटाबंदीच्या काळात काम ठप्प झाले
- प्रशासकीय पातळीवर अनास्था; वेळेवर निर्णय होत नाहीत
- प्रकल्पप्रमुख अधिकारी बिलकूल लक्ष देत नाहीत