लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: मार्केट यार्ड भागातील एका बंगल्यातून चोरट्यांनी १५ लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एका व्यावसायिकाने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार दूग्ध व्यावसायिक असून, त्यांचा मार्केट यार्ड भागातील संदेशनगर परिसरात बंगला आहे.
व्यावसायिक आणि त्यांची पत्नी सोमवार पेठेतील नातेवाईकांकडे अधिक मासानिमित्त जेवण करण्यासाठी गेले होते. चोरट्यांनी बंगल्याचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील रोकड आणि सोन्याचे दागिने असा १५ लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेला. दाम्पत्य घरी परतले. तेव्हा शयनगृहातील कपाट उचकटून चोरट्यांनी ऐवज लांबविल्याचे उघडकीस आले.
आणखी वाचा- पिंपरी चिंचवड : अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे विरोधी पक्षाचे नेते नजरकैदेत
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी बंगल्याच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले असून, सहायक पोलीस निरीक्षक कांबळे तपास करत आहेत.