नारायण पेठेतील भारतीय मजदूर संघाच्या कार्यालयाचे कुलूप तोडून तिजोरीतून ५५ हजार रुपयांचा माल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी उदय माधव पटवर्धन (वय ६२, रा. स्टर्निग व्होरायजन, पाषाण) यानी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायण पेठेत भारतीय मजदूर महासंघाचे राज्याचे प्रादेशिक कार्यालय आहे. गुरुवारी रात्री सात वाजता कार्यालयास कुलूप लावून गेल्यानंतर शुक्रवारी सकाळी हे कुलूप उघडे असल्याचे दिसून आले. चोरटय़ांनी तिजोरीतील ५५ हजार रुपयांचा माल चोरून नेल्याचे आढळून आले. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक लंबे हे अधिक तपास करत आहेत.

Story img Loader