पिंपरी : म्हाळुंगे एमआयडीसी परिसरात विद्युत रोहित्रातील तांब्याच्या तारा चोरणाऱ्या दोघांना म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून कॉपर कॉईल तारा, चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी, इतर साहित्य असा एकूण दोन लाख ३० हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत.

मोहित तेजबहादुर सिंग (वय २७) आणि आकाश अखिलेश चौबे (वय २५, दोघे रा. भोसरी, पुणे. मूळ रा. उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाळुंगे एमआयडीसी परिसरातील ग्रामीण वसाहती आणि नव्याने विकसित होत असलेल्या औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र विद्युत पारेषण विभागामार्फत नवीन विद्युत रोहित्र बसविण्यात आले आहेत. या विद्युत रोहित्रातील तांब्याच्या कॉईल चोरीला जाण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने म्हाळुंगे पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली. त्यानंतर दोन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून तांब्याच्या तारा, दुचाकी जप्त केली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलिस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंग गौर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रविण कांबळे, सहायक पोलिस निरीक्षक कल्याण घाडगे, सहायक फौजदार राजेंद्र मोरे, राजू जाधव, राजू कोणकेरी, पोलीस अंमलदार अमोल बोराटे, युवराज बिराजदार, विठ्ठल वडेकर, तानाजी गाडे, किशोर सांगळे, गोरख गाडीलकर, प्रकाश नवले, शिवाजी दिघे, संतोष काळे, प्रशांत ठोंबरे, शिवाजी लोखंडे, राजेंद्र खेडकर, संतोष वायकर, गणेश गायकवाड, अमोल माटे, राजेंद्र गिरी, शरद खैरे यांच्या पथकाने केली.