लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : खरेदीच्या बहाण्याने सराफी दुकानामध्ये आलेल्या दोन बुरखाधारी महिलांनी १ लाख ९० हजारांच्या दागिन्यांची चोरी केली. लष्कर भागातील सुभाष ज्वेलर्समध्ये १ जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा-संस्कृत शब्दकोशाच्या महाप्रकल्पाचे पुनरुज्जीवन, केंद्र सरकारकडून सहकार्य

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुरखा परिधान केलेल्या दोन महिला १ जानेवारी रोजी दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने सुभाष ज्वेलर्समध्ये गेल्या होत्या. त्यांनी दुकानातील कामगारांची नजर चुकवित दोन सोन्याच्या बांगड्या हातचलाखीने चोरून नेल्या. १ लाख ९० हजारांच्या बांगड्या चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर दुकानाच्या मालकाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस उपनिरीक्षक विजय बनसुडे तपास करीत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Theft of jewellery under pretended of purchase case has been registered against two women pune print news vvk 10 mrj
Show comments