पुणे: शहरात मोटारींचे सायलेन्सर चोरणाऱ्या टोळीला पोलिसांच्या युनीट पाचने गजाआड केले आहे. त्यांच्याकडून तीन लाख २० हजार रुपये किमतीचे सायलेन्सर जप्त करण्यात आले आहेत. त्यांनी हडपसर, शेवाळवाडी, फुरसुंगी, ऊरुळी देवाची, मुंढवा, मांजरी भागातील वाहनांचे सायलेन्सर चोरी केले होते. सायलेन्समध्ये मौल्यवान प्लॅटिनम धातू मिश्रीत माती काढून ती परराज्यात विक्री करण्यासाठी ही चोरी होत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
हेही वाचा >>> पुणे: पवारांचा खेळ साऱ्या खेळांना गुंडाळणारा; धनंजय मुंडे यांची टिप्पणी
आरिफ सलीम शेख (वय १९ रा. हडपसर), हुसेन बढेसाहब शेख (वय २३), साहील वसीम शेख (वय १९ रा. वैदवाडी, हडपसर), सहजाद अक्रम खान (वय १९ रा. वैदवाडी, हडपसर), रहिम खलील शेख (वय २४ रा. रामटेकडी), सोहेल सलीम खान (वय २३ रा. महंमदवाडी रोड), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
हेही वाचा >>> पुणे: शिवसेना आमदार भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा
रस्त्यालगत उभ्या केलेल्या मोटारींचे सायलेन्सर चोरीच्या घटना वाढल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर युनीट पाचचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी हडपसर परिसरातून सायलेन्सर चोरट्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून १६ सायलेन्सर जप्त करण्यात आले आहेत. ही कामगिरी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस उपनिरीक्षक अविनाश लोहोटे, उपनिरीक्षक चैताली गपाट, पोलीस अंमलदार रमेश साबळे, आश्रुबा मोराळे, राजस शेख, प्रताप गायकवाड, दिपक लांडगे, प्रमोद टिळेकर, चेतन चव्हाण, शहाजी काळे, विनोद शिवले, दाऊद सय्यद, पृथ्वीराज पांडुळे, किशोर पोटे, शशीकांत नाळे, राहुल ढमढेरे, पांडुरंग कांबळे, अमित कांबळे यांनी केली आहे.