पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींचे नाव जाहीर झाल्यावर लोकांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून केंद्रामध्ये सत्ता परिवर्तन अटळ असल्याचा विश्वास खासदार शिवाजीराव आढळराव हे शिरूर तालुक्यातील गावभेटी दौऱ्याकरिता आलेल्या भेटी दरम्यान व्यक्त केला.
या वेळी शिरूरचे माजी आमदार बाबूराव पाचर्णे, गावकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. आढळराव म्हणाले, खासदार हा विकासासाठी असून स्वविकासाठी नसतो. या भावनेतून काम केले आहे. राजकारणाची दिशा बदलत चालली आहे. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या होऊन महिना उलटला, तरी आरोपी सापडत नाही. भांबर्डे येथील मळगंगामंदिरचा तीर्थक्षेत्रात समावेश करण्याकरिता पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन ही त्यांनी या वेळी गावकऱ्यांना दिले. पाचर्णे म्हणाले, तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखाना विधानसभा निवडणुकीपूर्वी पुणे जिल्ह्य़ातील ऊस कारखान्याच्या दराच्या स्पर्धेत होता. निवडणुकीनंतर तो ऊस दराच्या स्पर्धेत दिसत नाही, ऊसदराच्या प्रश्नावर आवाज उठविणार असून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य भाव मिळाला पाहिजे.

Story img Loader