पुणे : स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी व्यवस्थापनांना शिक्षक भरतीसाठी पवित्र संकेतस्थळावर आरक्षणानुसार विषयनिहाय रिक्त पदांची नोंद करून जाहिरात देण्याची सुविधा १५ जानेवारीपर्यंत देण्यात आली होती. जास्तीत जास्त रिक्त पदांसाठी ही मुदत २२ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली होती. ही मुदत आता संपुष्टात आली असून, नोंदणी केलेल्या सर्व व्यवस्थापनांना त्यांच्या जाहिराती संकेतस्थळावर प्रकाशित करण्याची उर्वरित प्रक्रिया २४ जानेवारीपर्यंत पूर्ण करता येणार आहे. शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्यात शिक्षक भरती प्रक्रियेत ३० हजार पदांच्या भरतीची घोषणा करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यामुळे राज्यभरातील उमेदवारांचे या भरती प्रक्रियेकडे लक्ष लागले आहे. संकेतस्थळावर जाहिराती प्रकाशित झाल्यानंतर उमेदवारांना प्राधान्यक्रम नोंदवण्याची सुविधा दिली जाणार आहे. मांढरे यांनी दिलेल्या माहितीनुसार संकेतस्थळावर जाहिराती दिल्यानंतर सर्व जाहिराती पात्र उमेदवारांना २९ जानेवारीपर्यंत पाहण्यासाठी मुदत दिली जाणार आहे. त्यानंतर पात्र उमेदवारांना प्राधान्यक्रम उपलब्ध करून दिले जातील. त्याबाबतच्या सूचना स्वतंत्रपणे दिल्या जातील. विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक), बृहन्मुंबई शिक्षण निरीक्षक यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रलंबित जाहिराती पूर्ण करून तपासून दिल्यानंतर संबंधित व्यवस्थापनांनी शासन निर्णयानुसार त्यांच्या कार्यक्षेत्रातील वर्तमानपत्रात देण्याची कार्यवाही करावी. दिलेल्या वेळापत्रकानुसार कार्यवाही करावी असे स्पष्ट करण्यात आले आहे.