लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : औद्योगिक, कामगारनगरीमुळे श्रीमंत महापालिका असा लौकिक मिळालेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या एकाही रुग्णालयात भाजलेल्या रुग्णावर उपचार करण्यासाठी जळीत कक्ष (‘बर्न वॉर्ड’) नाही. भाजलेल्या रुग्णांवर तातडीने उपचार करणे गरजेचे असते. मात्र, महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात जळीत कक्षच नसल्याने त्यांना ससून रुग्णालयांत दाखल करण्याशिवाय पर्याय राहत नाही. दरम्यान, मागील १४ वर्षांपासून जळीत कक्षाचे भिजत घोंगडे आहे.

Police patrol J J Hospital, Mumbai,
मुंबई : डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी जे.जे. रुग्णालयात पोलीस घालणार गस्त
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Organ donation, brain dead patient,
सांगली : मेंदुमृत रुग्णाचे अवयवदान; लष्करी अधिकाऱ्याला सलामी
Kalyan, Khadakpada Police Station, School Security, CCTV Installation, Student Safety,
कल्याणमधील शाळांना सीसीटीव्ही बसविण्याच्या पोलिसांच्या सूचना
Monkeypox, monkeypox virus india,
सावधान! मंकीपॉक्स झपाट्याने पसरतोय… नागपुरातील ‘या’ रुग्णालयांत उपचाराची व्यवस्था
Bomb threat, medicover hospital,
खारघरच्या मेडीकव्हर रुग्णालयाला ‘बॉम्ब’ धमकीचा मेल
Outpatient services closed in the district including Sangli and Miraj
सांगली, मिरजेसह जिल्ह्यात बाह्य रुग्ण सेवा बंद
Resident doctors protest impacts patient care
Resident Doctors Strike : निवासी डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णसेवेला फटका; शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याची ससूनवर वेळ

वैद्यकीय विभागांतर्गत शहराच्या विविध भागांमध्ये आठ मोठी रुग्णालये, २७ दवाखाने, २० आरोग्य केंद्र आहेत. ७५० खाटांच्या क्षमतेचे सर्वात मोठे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम), ४०० खाटांचे थेरगाव, शंभर खाटांचे नवीन भोसरी, १३० खाटांचे नवीन आकुर्डी आणि १२० खाटांचे नवीन जिजामाता यासह एक हजार ५८९ खाटांची व्यवस्था महापालिकेच्या रूग्णालयात आहे. परंतु, त्यातील कोणत्याही रुग्णालयात जळीत कक्ष नाही. त्यामुळे भाजलेल्या रुग्णांना पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करावे लागते. वायसीएममध्ये जळीत कक्ष नसल्याने केवळ प्रथमोपचार केले जातात. योग्य उपचारासाठी रुग्ण ससूनमध्ये दाखल होईपर्यंत उशीर झालेला असतो. परिणामी, रुग्ण दगावण्याच्या घटना घडल्या आहेत.

आणखी वाचा-पिंपरी: महापालिका आयुक्त सल्लागारावर मेहरबान; दुसऱ्यांदा मुदतवाढ, तीन कोटी उधळणार

गेल्या काही वर्षांत पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. सद्यस्थितीत शहराची लोकसंख्या २७ लाखांच्या घरात आहे. शहरात भोसरी, तळवडे आणि शहरालगत चाकण, तळेगाव दाभाडेमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) परिसर आहे. मोठ्या प्रमाणावर कारखाने आहेत. दुर्घटना घडल्यानंतर जखमीला उपचारांसाठी वायसीएम दाखल केले जाते. मात्र, येथे प्राथमिक उपचार करून ससून रुग्णालयात हलवले जाते. वायसीएम रुग्णालयात मागच्यावर्षी २१३, चालू वर्षात जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत ११६ जळीत रुग्ण उपचारांसाठी आले होते. किरकोळ जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले. तर, गंभीर जखमींना ससून रुग्णालयात पाठविण्यात आले.

आणखी वाचा-भुजबळ दाखविणार आज इंदापुरात ‘बळ’… जरांगे पाटलांच्या सभेपेक्षा विराट सभा होणार का?

१४ वर्षांपूर्वी मांडला होता प्रस्ताव 

जळीत रुग्णांच्या उपचारासाठी स्वतंत्र इमारतीची आवश्‍यकता असल्याची बाब लक्षात घेऊन याबाबत तत्कालीन मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नागकुमार कुणचगी यांनी २००९ मध्ये प्रस्ताव मांडला होता. त्यासाठी वीस कोटींचा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठविला होता. त्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद केली होती. परंतु, त्या प्रस्तावाचा सर्वांनाच विसर पडल्याचे दिसून येत आहे.

तळवडे दुर्घटनेतील जखमींवर ससूनमध्ये उपचार

तळवडे येथील केकवर लावायच्या शोभेच्या फटाक्याच्या (स्पार्कल कैंडल) मेणबत्ती कारखान्यात आग लागून स्फोट होऊन सहा जणांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. तर, जखमी असलेल्या दहा रुग्णांवर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील चार महिलांची प्रकृती चिंताजनक आहे.