पिंपरी चिंचवड: राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर भाजप- शिंदे सरकारसोबत अजित पवार आणि काही आमदार सामील झाले आहेत. यामुळे आता अनेक ठिकाणी भाजपा आणि शिवसेनेच्या आमदार, खासदारांना राष्ट्रवादी सोबत जुळवून घेण्याची वेळ आली आहे. यावरच भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी राजकारणात समीकरणे बदलत असतात. राजकारणात काय होईल यावर विचार करण्यापेक्षा समीकरणांसोबत जे लोक आलेत त्यांच्याबरोबर राहून शहराचा विकास साधण्याबाबत मत व्यक्त केले आहे. अजित पवारांसोबत काम करताना अडचण येईल असं वाटत नाही असं ते म्हणाले. ते पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेत भाजपची सत्ता होती. त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजपा आमने सामने होते. परंतु, आता सत्तेत राष्ट्रवादीचे नेते आल्यामुळे स्थानिक पातळीवर देखील भाजपाला राष्ट्रवादीसोबत जुळवून घ्यावं लागणार आहे. भोसरी विधानसभा आणि शिरूर लोकसभा लढवण्याबाबत ठाम असलेले आमदार लांडगे यांनी भाजपचे जेष्ठ नेते जे सांगतील तो निर्णय मान्य असेल असे देखील म्हटल आहे.

Pune BJP Shiv Sena corporators
शिवसेना नगरसेवकांच्या प्रवेशामुळे भाजपमध्ये नाराजी, काय आहे कारण ?
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Setback to Sena (UBT) in Pune 5 ex corporators of party set to join BJP
पाच माजी नगरसेवक करणार मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश; पुण्यात शिवसेना ठाकरे पक्षाला धक्का
Gulabrao Deokar , BJP, Ajit Pawar group, Ajit Pawar ,
गुलाबराव देवकर यांची पाऊले आता भाजपकडे, अजित पवार गटात पक्षप्रवेशास विरोध
sanjay gaikwad controversial statement
Sanjay Gaikwad: “तुमच्यापेक्षा तर रांXX बऱ्या”, शिंदे गटाच्या आमदाराची मतदारांनाच शिवीगाळ, भर सभेत जीभ घसरली!
dhananjay munde
मुंडेंच्या बंगल्यावर खंडणीसाठी बैठक; भाजप आमदार सुरेश धस यांचा आरोप
Loksatta lalkilla Congress BJP campaign AAP alleges corruption Sheila Dikshit
लालकिल्ला: काँग्रेसच्या खांद्यावर भाजपची मोहीम!
Manoj Jarange Patil on Dhananjay Munde
Manoj Jarange Patil: “… तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही”, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

आणखी वाचा-“अजित पवारांना पक्षावर दावा करता येणार नाही, कारण…”, घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं मोठं विधान

महेश लांडगे म्हणाले, राजकारणात समीकरण बदलत राहतात. २०१९ ला बघितलं की आमच्यातील घटकपक्ष (ठाकरे गट) आम्हाला सोडून गेला. त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत युती केली. राजकारणात काय होईल यावर विचार करण्यापेक्षा समीकरणांसोबत जे लोक आलेत त्या लोकांबरोबर राहून शहराचा विकास साधावा. पुढे ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे महाराष्ट्राचा आणखी विकास करतील. महाविकास आघाडीतील नेत्यांनी २०१९ च्या आधी एकमेकांवर टीका, आरोप- प्रत्यारोप केले. आता अजित पवार सत्तेत सहभागी झालेत, अजित पवारांसोबत काम करताना अडचण येईल असं वाटत नाही. पुढे ते म्हणाले, शिरूर लोकसभा, भोसरी विधानसभा बाबत भाजपच्या जेष्ठ नेते सांगतील ते मान्य असेल असही ते म्हणाले आहेत.

Story img Loader