पुणे / पिंपरी : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या सत्तेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार त्यांचा गट घेऊन सहभागी झाल्याने पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील बदललेल्या सत्तासमीकरणाचा परिणाम आगामी मंत्रिमंडळ विस्तारातही दिसून येण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या समर्थकांना मंत्रिमंडळ विस्तारात राज्यमंत्रिपद मिळेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. त्या दृष्टीने इच्छुकांकडून नेत्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या आहेत.

मंत्री होण्यास इच्छुक असलेल्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील आमदारांची वाढती संख्या लक्षात घेता मंत्रिमंडळ विस्तारात जिल्ह्याला किती मंत्री मिळणार, हा प्रश्न उपस्थित होण्यास सुरुवात झाली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या आठवड्यात होईल, अशी शक्यता आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांची आगामी निवडणूक लक्षात घेऊन पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला मंंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. मंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये पुणे आणि पिंपरीसह जिल्ह्यातील आमदार उत्सुक असले, तरी मंत्रिमंडळ विस्तारात धक्कातंत्र वापरले जाणार, की आगामी निवडणूक लक्षात घेऊन मंत्रीपद आणि राज्यमंत्रीपद दिले जाणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

Manmohan Singh resume dr Manmohan Singh CV
Manmohan Singh Resume : प्राध्यापक, आरबीआय गव्हर्नर, अर्थमंत्री ते पंतप्रधान…; मनमोहन सिंग यांचा बायोडाटा होतोय व्हायरल, नेमकं त्यात लिहिलंय काय, वाचा
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Image of Manmohan Singh's sister
Manmohan Singh Death : मनमोहन सिंग यांच्या बहिणीची व्यथा, आजारपणामुळे घेता येणार नाही भावाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
how many press conference taken by dr manmohan singh
Dr. Manmohan Singh Death: डॉ. मनमोहन सिंग यांनी १० वर्षांत किती पत्रकार परिषदा घेतल्या? पंतप्रधान मोदींशी याची तुलना का केली जाते?
minister dhananjay munde meet cm devendra fadnavis over murder of sarpanch santosh deshmukh
आरोपांनंतर धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
Ex PM Manmohan Singh Admitted To AIIMS In Delhi
Ex PM Manmohan Singh: माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडली, AIIMS रुग्णालयात दाखल
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
Image Of India Alliance Leaders.
AAP vs Congress : “तर काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू”; काँग्रेसला भाजपाकडून निधी, आपचे गंभीर आरोप

हेही वाचा – छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी; काेल्हापूरमधील तरुण ताब्यात

पुण्यातील इच्छुक

सध्याच्या मंत्रिमंडळात कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील मंत्री आहेत. नव्या सत्ता समीकरणात अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील यांना स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे शहराला सध्या तीन मंत्री आहेत. पर्वती विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून आलेल्या माधुरी मिसाळ यांनाही मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. पुण्यातून अद्यापही महिला आमदाराला मंत्रीपद मिळालेले नाही. भाजपचे सरकार असताना मिसाळ मंत्रीपदासाठी आग्रही होत्या. खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्याही नावाचा विचार होऊ शकतो, असा अंदाज आहे. मात्र भाजपाने धक्कातंत्राचा अवलंब केल्यास शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार आणि फडणवीस यांचे समर्थक सिद्धार्थ शिरोळे यांच्या, तर जातीय समीकरणे जुळविण्यासाठी सुनील कांबळे यांच्या नावाचाही विचार होण्याची शक्यता आहे. मात्र यापैकी एकालाच राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.

पिंपरी-चिंचवडमधील दावेदार

अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारसोबत आल्याने पिंपरी-चिंचवड शहरात भाजपाची ताकद कायम ठेवण्यासाठी शहराध्यक्ष, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना राज्यमंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता आहे. सन २०१७ च्या महापालिका निवडणुकीत महापालिकेत भाजपाची सत्ता द्या, शहराला मंत्रीपद देतो, असे जाहीर आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. अजित पवार यांचा पिंपरी महापालिका पुन्हा ताब्यात घेण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे महापालिकेत भाजपाची सत्ता कायम राखण्यासाठी भाजपाकडून महेश लांडगे यांना ताकत दिली जाईल.

हेही वाचा – पिंपरी पोलिसांकडून गुन्हेगारांची झाडाझडती; ५७ आरोपींना अटक

लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पालिकेत पुन्हा भाजपाची एकहाती सत्ता आणणे आव्हान असणार आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लांडगे यांना ताकत देत राज्यमंत्री करू शकतात अशी जोरदार चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात आहे. गेल्या वेळी मावळचे तत्कालीन आमदार संजय भेगडे यांना संधी मिळाल्याने लांडगे यांचा पत्ता कट झाला होता. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीचे एकमेव आमदार अण्णा बनसोडे हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. पहाटेच्या शपथविधीवेळी पवार यांच्यासोबत शेवटपर्यंत राहिलेले बनसोडे एकमेव आमदार आहेत. आताच्या बंडावेळीही बनसोडे सुरुवातीपासून पवार यांच्यासोबत आहेत. या निष्ठतेचे फळ म्हणून राज्यमंत्री दर्जा असलेले महामंडळ बनसोडे यांना देण्यात येणार असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे.

कुल, भरणेही स्पर्धेत

दरम्यान, दौंडचे आमदार राहुल कुल आणि इंदापूरचे आमदार दत्ता भरणेही मंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये आहेत. त्यामुळे मंत्रीपद कोणाला मिळणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

Story img Loader