लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे: माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राज्यात खळबळ उडाली असताना आज मुंबईत होणाऱ्या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना निमंत्रण देण्यात आलेले नाही. ‘ती राष्ट्रीय स्तरावरील बैठक असून, मला बोलावण्याची गरज वाटली नसेल’ असे वक्तव्य करत पाटील यांनी नाराजीचा सूर काढला आहे.

पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने समिती नेमली असून, त्या समितीची बैठक मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे होणार आहे. मात्र, या बैठकीला जयंत पाटील हे उपस्थित नाहीत. ते पुण्यात एका कार्यक्रमाला आले असताना त्यांच्याकडे याबाबत विचारणा करण्यात आली असता पाटील म्हणाले, ‘ती राष्ट्रीय स्तरावरील बैठक आहे. मला बोलविण्याची कदाचित गरज भासली नसेल आणि प्रत्येक बैठकीला बोलवले पाहिजे, असा आग्रह नसावा.’

आणखी वाचा- “निवृत्त पदाधिकारी होतात, जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे राजे नव्हे” शरद पवारांसाठी पुण्यात झळकले बॅनर्स

‘माझे आणि सुप्रिया सुळे यांचे बोलणे झाले आहे. त्यामध्ये अशी बैठक झालेली नाही आणि बोलविण्यात आलेली नाही. माझे पवार यांच्याशीही बोलणे झाले आहे. सायंकाळी पाच वाजता बैठक होणार आहे. त्या बैठकीला मी पोहोचणार आहे” असे पाटील यांनी स्पष्ट केले.

वज्रमुठ सभा ही उन्हाळ्यात घेणे अवघड होणार आहे. त्यामुळे एक मे रोजी रोजी झालेल्या अनौपचारिक बैठकीत तारखा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला आहे’ असेही पाटील म्हणाले.