विसर्जन मिरवणुकीत मोबाईल संच लांबविणाऱ्या हरियाणातील चोरट्याला फरासखाना पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून मोबाइल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सहदेवसिंग चहलसिंग चौहान (वय ३०, रा. सिकंदरपूर, जि. पलवाल, हरियाणा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका अल्पवयीन मुलाने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार मुलगा कोथरुड भागात राहायला आहे. विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी बेलबाग चौकात आला होता. त्या वेळी गर्दीत मुलाकडील दहा हजारांचा मोबाइल संच चौहानने हिसकावला. मुलाने आरडाओरडा केला. बंदोबस्तावरील पोलिसांनी त्याला पकडले. चौहान याने विसर्जन मिरवणुकीत आणखी काही जणांचे मोबाईल संच हिसकावल्याचा संशय असून सहायक पोलीस निरीक्षक शिंदे तपास करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> लोणावळा : आरपीआयला हवे मुंबईत उपमहापौर, तर पुण्यात महापौरपद ; रामदास आठवलेंची मागणी

दरम्यान, विसर्जन मिरवणुकीत मोबाईल हिसकावण्याचे फरासखाना, विश्रामबाग, वानवडी पोलीस ठाण्यात वेगवेगळे पाच गुन्हे दाखल झाले आहेत. लक्ष्मी रस्त्यावरील शगुन चौकात एका तरुणीचा ४० हजारांचा मोबाइल संच लांबविण्यात आला. नारायण पेठेतील केळकर रस्त्यावर एकाचा दहा हजारांचा मोबाइल संच लांबविण्यात आला. शनिवारवाडा परिसरात पेशवे गणपती मंदिरासमोर तरुणाच्या खिशातून पाच हजारांचा मोबाईल संच लांबविण्यात आला. बेलबाग चौकात एकाचा पाच हजार रुपयांचा मोबाईल संच लांबविण्यात आला. वानवडीतील संविधान चौकात विसर्जन मिरवणुकीत नृत्य करणाऱ्या तरुणाच्या खिशातून ४० हजारांचा मोबाईल संच लांबविण्यात आला. विसर्जन मिरवणुकीत चोरट्यांनी अनेकांचे संच लांबविले असून आतापर्यंत वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल झाले आहेत.