पुणे : लाडकी बहीण योजनेतील पैशांचे वाटप सुरू असल्याच्या बतावणीने चोरट्याने ज्येष्ठ महिलेकडील ८० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. हडपसर भागात ही घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ महिला हडपसर भागात राहायला आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तीन दिवसांपूर्वी त्या सकाळी अकराच्या सुमारास हडपसर भागातून निघाल्या होत्या. त्यावेळी एका चोरट्याने त्यांना अडवले. आमचे साहेब लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचे वाटप करत आहेत. चोरट्याने त्यांना बोलण्यात गुंतविले आणि मंगळसूत्र आणि अंगठी काढून ठेवण्यास सांगितले. त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्याने दागिने चोरले. त्यानंतर चोरटा पसार झाला. पोलीस हवालदार कांबळे तपास करत आहेत.

हेही वाचा…पिंपरी : तोतया पोलीस, मनी लाँड्रिंगची भीती आणि महिलेची एक कोटी रुपयांची फसवणूक

शहरात मोफत साडी, पैसे वाटप करण्याच्या आमिषाने महिलांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. स्वारगेट भागात चोरट्यांनी एका महिलेकडील ४० हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thief stole rs 80 000 worth of gold from elderly woman claiming aid pune print news rbk 25 sud 02